iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत... होणार हे 5 मोठे अपग्रेड
Apple उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी त्यांचा मोठा ईव्हेंट आयोजित करण्याची तयारी करत आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची आगामी आयफोन 17 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या आगामी आयफोन सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या सिरीजमधील सर्वात चर्चेत असणारे मॉडेल्स म्हणजे iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air. असं सांगितलं जात आहे की, या दोन्ही मॉडेलमध्ये बराच बदल केला जाणार आहे.
आगामी iPhone 17 Pro Max बाबत अशी माहिती समोर आली आहे की, या मॉडेलमध्ये 5 मोठे बदल केले जाणार आहेत. याच बदलांबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत अनेक बदल होणार आहेत. थोडक्यात काय तर आगामी आयफोनचे रंगरुप आता बदलणार आहे. याच कारणामुळे सध्या हे मॉडेल प्रचंड चर्चेत आहे. iPhone 17 Pro Max मध्ये कोणते बदल केले जाऊ शकतात, याबाबत आता थोडक्यात जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी आयफोनने त्यांच्या कॅमेरा डिझाईनवर बराच फोकस केला आहे. iPhone 17 Pro Max मध्ये एक नवीन आणि मोठे रेक्टेंगुलर कॅमेरा आइलँड पाहायला मिळणार आहे. यावेळी देखील कंपनी त्यांचे प्रिमियम आयफोन मॉडेल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करणार आहे. मात्र त्याच्या डिझाईनमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत. यावेळी फ्लॅश आणि LiDAR सेन्सर दुसऱ्या बाजूला हलवले जाऊ शकतात.
केवळ डिझाईनच नाही तर कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील मोठे अपग्रेड पाहायला मिळणार आहेत. या आयफोनच्या बॅकवर 48MP + 48MP + 48MP असा कॅमेरा सेटअप पहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूमचा सपोर्ट देखील असणार आहे. तसेच या फोनमध्ये पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन 24MP सेल्फी कॅमेरा पहायला मिळणार आहेत.
यावेळी फोनमध्ये 6.9-इंचाचा ProMotion OLED पॅनल पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी डिव्हाईसमध्ये पातळ बेझल, लहान डायनॅमिक आयलंड आणि पूर्वीपेक्षा मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते. या बदलामुळे फोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे.
iPhone 17 Pro Max मध्ये यावेळी ऑल न्यू Apple चा A19 Pro चिपसेट पाहायला मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत बेस स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच या फोनमध्ये चांगल्या हीट मॅनेजमेंटसाठी एक समर्पित व्हेपर कूलिंग चेंबर देखील उपलब्ध असू शकते.
यावेळी कंपनी त्यांच्या आगामी प्रिमियम मॉडेलमध्ये 5000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. तसेच डिव्हाईसला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. तसेच, हा फोन नवीनतम iOS 26 वर चालेल, ज्यामध्ये नवीन Apple Intelligence वैशिष्ट्ये देखील दिसू शकतात. याशिवाय, फोनमध्ये एकूण परफॉर्मंस मध्ये मागील मॉडेलपेक्षा अनेक अपग्रेड देखील असतील.