iPhone 17 Series launch: अवघे काही तास शिल्लक! आगामी आयफोन लाँचसाठी युजर्स उत्साही! कधी, कुठे आणि कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?
Apple’s ‘Awe-Dropping: 2025 मधील सर्वात मोठा स्मार्टफोन लाँच ईव्हेंट उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा ईव्हेंट अत्यंत खास आहे. कारण या ईव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या ईव्हेंटसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. हा ईव्हेंट 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सर्वजण आगामी आयफोन लाँचिंगसाठी अत्यंत उत्सुक आहेत. अवघ्या काही तासांतच नवीन आयफोन सिरीज आपल्या सर्वांना पहायला मिळणार आहे.
Apple ने 9 सप्टेंबर रोजी ‘Awe Dropping’ इव्हेंटचे आयोजन केले आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांची आगामी आयफोन 17 सिरीज तसेच अनेक इतर प्रोडक्ट्स देखील लाँच करणार आहे. या ईव्हेंटवर आता संपूर्ण टेक विश्वाचं लक्ष लागलं आहे. खरं तर या ईव्हेंटमध्ये लाँच केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सकडून युजर्सना बऱ्याच अपेक्षा आहेत. हा ईव्हेंट कधी आयोजित केला जाणार, युजर्स हा ईव्हेंट कुठे पाहू शकतात आणि या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जाणार, याबाबत आता जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – Pinterest)
Apple चा ‘Awe Dropping’ ईव्हेंट 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा ईव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे. हा ईव्हेंट युजर्स Apple टिव्ही, कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहू शकणार आहेत. म्हणजेच तुम्ही घरबसल्या हा आगामी ईव्हेंट लाईव्ह पाहू शकणार आहात. या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच होऊ शकतात, याबाबत आता जाणून घेऊया.
कंपनी या ईव्हेंटमध्ये आयफोन 17 सीरीज लाँच करणार आहे. या सिरीजअंतर्गत चार मॉडेल लाँच केली जातील. ज्यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 एयर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स यांचा समावेश असणार आहे. प्रो मॉडेल यावेळी नवीन डिझाईनसह लाँच केला जाणार आहे. यासोबतच प्लस मॉडेलची जागा अल्ट्रा-स्लिम एअर मॉडेल घेणार आहे. इतर अपग्रेड्ससह, या मालिकेत पहिल्यांदाच 24MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
‘Awe Dropping’ ईव्हेंटमध्ये कंपनी AirPods Pro 3 लाँच केला जाण्याची शक्यता आहे. अपग्रेड म्हणून कंपनी या डिव्हाईसचे चार्जिंग केस थोडे छोटे करणार आहे. त्याचप्रमाणे, इअरबड्सच्या डिझाइनमध्येही थोडा बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लाईव्ह ट्रान्सलेशनसारखे फीचर देखील अपेक्षित आहे.
Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes
या ईव्हेंटमध्ये कंपनी नवीन वॉच देखील लाँच करण्याची शक्यता आहे. Apple Watch Ultra 3 तब्बल दोन वर्षांनंतर एका मोठ्या अपग्रेडसह लाँच केले जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, परवडणारी Apple Watch SE अपग्रेडेड डिस्प्ले आणि वेगवान प्रोसेसरसह लाँच केली जाऊ शकते. यामध्ये मोठा डिस्प्ले, S11 प्रोसेसर, 5G प्रोसेसर आणि सॅटेलाइट मेसेजिंग सारखे अपग्रेड्स मिळण्याची शक्यता आहे. Apple Watch Series 11 मध्ये काही खास बदल होण्याची अपेक्षा नाही.