Flipkart – Amazon Sale 2025: या कारणांमुळे ऑनलाइन सेलमध्ये कमी होतात प्रोडक्टच्या किंमती, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
ऑनलाईन शॉपिंग की ऑफलाईन शॉपिंग असा प्रश्न विचारल्यास 80 टक्के लोकं नक्कीच ऑनलाईन शॉपिंगची निवड करतील. कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये घरबसल्या कमी किंमतीत सामान खरेदी करता येते. तसेच ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी सेल देखील आयोजित करत असतात. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होता. ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगमधील सर्वात मोठा फरक म्हणजे वस्तूंच्या किंमती. ऑनलाईन सामान खरेदी करताना ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे वस्तूची किंमत प्रचंड कमी होते. तसेच सेल सुरु असेल तर या वस्तू आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळते.
Flipkart, Amazon, Meesho किंवा Myntra सारख्या कंपन्या वेळोवेळी सेलची घोषणा करत असतात. या सेलमध्ये सहसा अनेक वस्तूंवर 50% ते 80% डिस्काऊंट ऑफर केलं जातं. हे डिस्काऊंट पाहून ग्राहकांना एकच प्रश्न पडतो, की सेलमध्ये वस्तूंच्या किंमती इकत्या कमी कशा होतात? यामागील कारण काय आहे? यामागे कंपनीचे कोणते खास कारण आहे का? आता आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तर देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की सेलमध्ये वस्तूंच्या किंमती इतक्या कमी का होतात? (फोटो सौजन्य – Pinterest)
ई कॉमर्स कंपन्या थेट मॅन्युफॅक्चरर्स आणि ब्रांड्सकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात. सामान जास्त असल्याने वस्तूंच्या किंमती कमी होतात. तसेच जेव्हा नवीन प्रोडक्ट किंवा स्मार्टफोनचे नवीन मॉडेल लाँच होते, तेव्हा जुना स्टॉक लवकरात लवकर विकण्यासाठी कंपन्या या वस्तूंवर मोठं डिस्काऊंट ऑफर करतात. ज्यामुळे जुना स्टॉक लवकर विकला जातो आणि ग्राहकांचा फायदा देखील होतो.
ऑफलाईन दुकानांमध्ये भाडे, स्टाफ आणि पगार, विजेचे बिल, पाणी या सर्वांमुळे मोठा खर्च होतो. याचा परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होतो. मात्र ऑनलाईन स्टोअरचा विचार केला तर इथे फक्त गोडाऊनचा खर्च करावा लागतो आणि डिलीवरी नेटवर्क मॅनेज करावं लागते. या कारणास्तव, ग्राहकांना स्वस्त उत्पादने पुरवण्यासाठी त्यांच्याकडे अधिक वाव आहे. मात्र ऑफलाईन स्टोअरमध्ये खर्च वाढल्यामुळे वस्तूंच्या किंमती देखील वाढतात.
सहस्या कंपन्या मोठ्या डिस्काऊंट यासाठी ऑफर करतात, कारण त्यांना ग्राहकांना आकर्षिक करायचं असतं. ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा ग्राहक तुमच्या वेबसाईटला देतो तेव्हा तो केवळ डिस्काउंटेड सामानच नाही तर इतर वस्तूंची देखील खरेदी करतो. यामुळे कंपनीला मोठा फायदा होतो.
सणासुदीचा काळ सुरु झाला की अनेक लोकं विक्रीवर भर देतात. याच संधीचा फायदा घेऊन कंपन्या मोठ्या सेलचे आयोजन करतात. “फ्लॅश सेल”, “लिमिटेड टाइम ऑफर” आणि “बिग बिलियन डेज” सारख्या सेलचे नाव ऐकून ग्राहक खरेदीची तयारी सुरु करतात. ही एक मानसिक तंत्र आहे ज्यामुळे ग्राहकांना असे वाटते की संधी हातून जाऊ शकते.
ऑनलाइन कंपन्या केवळ उत्पादने विकण्यासाठीच नव्हे तर ग्राहकांचा डेटा गोळा करण्यासाठी देखील विक्रीचा वापर करतात. जेव्हा जास्त लोक डिस्काउंट पाहून खाती तयार करतात तेव्हा कंपन्यांना त्यांचा ईमेल, नंबर आणि शॉपिंग पॅटर्न अशी माहिती मिळते जी मार्केटिंगमध्ये पुढे वापरली जाते.