Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक
Apple ने भारतात फेस्टिव सीजन ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनी त्यांच्या सर्व प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट ऑफर करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कंपनीचे महागडे डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. Apple च्या फेस्टिव्ह ऑफर्समध्ये ग्राहक लेटेस्ट iPhone 17, AirPods Pro 3, Watch Series 11, iPad Air आणि दूसऱ्या प्रोडक्टवर 10000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. थेट डिस्काउंटव्यतिरिक्त, कंपनी खरेदीदारांना कॅशबॅक डील आणि नो-कॉस्ट ईएमआय देखील ऑफर करत आहे. येथे, आम्ही तुम्हाला अॅपलच्या फेस्टिव सीजनमधील डीलबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.
Apple फेस्टिव सीजन ऑफरसह ग्राहक 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह आयफोन खरेदी करू शकतात. यासोबतच खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. iPhone 17 Pro आणि Pro Max च्या खरेदीवर 5,000 रुपये, iPhone Air च्या खरेदीवर 5,000 रुपये आणि iPhone 17 च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या खरेदीवर 4,000 रुपये आणि iPhone 16e च्या खरेदीवर देखील 4,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे. जर तुम्ही यावेळी तुमचा जुना आयफोन एक्सचेंज केला तर कंपनी 64,000 रुपयांपर्यंत तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करता येणार आहे. यासोबतच, नवीन आयफोन खरेदी केल्यावर, खरेदीदारांना 4 महिन्यांसाठी Apple Music, Apple TV+ आणि Apple Arcade चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
फेस्टिव्ह ऑफर्समध्ये ग्राहक Apple कंप्यूटर म्हणजेच नवीन मॅक 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह खरेदी करू शकता. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. MacBook Air च्या 13 इंच आणि 15 इंच खरेदीवर 10,000 रुपये, MacBook Pro च्या 14 इंच आणि 16 इंच खरेदीवर 10,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.
iMac वर 5,000 रुपये, Mac Studio वर 10,000 रुपये आणि Mac mini वर 4,000 रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. तुम्ही तुमचा जुना मॅक एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता, तसेच तीन महिन्यांचे Apple TV+ आणि Apple Arcade मोफत मिळवू शकता.
12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह ग्राहक नवीन आयपॅड खरेदी करू शकतात. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना अतिरिक्त सुट दिली जाणार आहे. iPad Air च्या 11 इंच आणि 13 इंच व्हेरिअंटच्या खरेदीवर 4,000 रुपये, iPad च्या खरेदीवर 3,000 रुपये, iPad mini च्या खरेदीवर 3,000 रुपये आणि iPad Pro च्या खरेदीवर 4,000 रुपयांचे डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. जुन्या आयपॅडवर एक्सचेंज बोनस, तसेच तीन महिने मोफत अॅपल टीव्ही+ आणि अॅपल आर्केड देखील असेल.
ग्राहक Apple Watch देखील 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह खरेदी करू शकणार आहेत. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. Apple Watch Ultra 3 च्या खरेदीवर 6,000 रुपये, Apple Watch Series 11 च्या खरेदीवर 4,000 रुपये आणि Apple Watch SE 3 च्या खरेदीवर 2,000 रुपयांचे कॅशबॅक ऑफर केलं जाणार आहे. जुनी वॉच एक्सचेंज केल्यास अतिरिक्त सवलती मिळू शकतात.