Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Wi-Fi Not Working? वर्क फ्रॉम होम करताना अचानक Wi-Fi बंद पडल्यास प्रत्येकवेळी इंजिनिअरला बोलावण्याची गरज नसते. राऊटर रीस्टार्ट करणे, राऊटरवरील लाईट तपासणे, केबल व्यवस्थित जोडलेली आहे का पाहणे आणि मोबाईलचा एअरप्लेन मोड ऑन-ऑफ करणे अशा काही सोप्या उपायांनी समस्या दूर होऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 04:42 PM
Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राऊटर बंद करून 30 सेकंदांनी पुन्हा सुरू केल्याने काही कनेक्शन समस्या दूर होऊ शकतात.
  • Wi-Fi काम करत नसेल तर केबल, राऊटरचे लाईट आणि फोनची नेटवर्क सेटिंग तपासा.
  • अनावश्यक डिव्हाइस डिस्कनेक्ट करा आणि गरजेनुसार 2.4GHz किंवा 5GHz नेटवर्क वापरा.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे इंटरनेट बंद पडणं. मिटिंग चालू आहे आणि मधेच वाई-फाई गेलं की सगळा मूड खराब होतो. मग आपण लगेच कंपनीच्या इंजिनिअरला फोन लावतो. पण थांबा, प्रत्येकवेळी इंजिनिअरला बोलवायची गरज नसते. बऱ्याचदा छोट्या छोट्या कारणांमुळे नेट बंद पडतं आणि ते तुम्ही घरच्या घरी ठीक करू शकता. कधी IP ॲड्रेसचा घोळ असतो तर कधी राऊटर चुकीच्या जागी ठेवलेला असतो. अशी 8 सोपी कामं आहेत जी करून तुम्ही तुमचं इंटरनेट स्वतः सुरू करू शकता.

1. सगळ्यात पहिलं – राऊटर बंद करून चालू करा

ही सगळ्यात जुनी ट्रिक आहे पण 100% काम करते. तुमच्या राऊटरचं बटण बंद करा. त्याचा प्लग पण काढून टाका. आता 30 सेकंद थांबा. घाई करू नका. 30 सेकंदानंतर परत प्लग लावा आणि राऊटर चालू करा. याने राऊटरची मेमरी साफ होते आणि तो फ्रेश होतो. 80% वेळा यानेच नेट परत येतं. Wi-Fi Not Working?

2. राऊटरवरचे लाईट बघा

राऊटरवर छोट्या छोट्या लाईट असतात. Power, PON, LOS, Internet असं लिहिलेलं असतं. नीट बघा. जर LOS चा लाईट लाल झाला असेल तर समजून जा की बाहेरूनच केबल तुटली आहे किंवा कंपनीकडूनच नेट बंद आहे. यात तुम्ही काहीच करू शकत नाही, कंपनीवाल्यांना फोन करावाच लागेल. पण जर सगळे लाईट हिरवे असतील आणि तरीही नेट चालत नसेल तर प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलमध्ये आहे.

3. केबल नीट लागली आहे का ते बघा

कधी कधी घर झाडताना किंवा लहान मुलांनी किंवा कुत्र्या मांजरामुळे राऊटरची केबल हलते. मागे जी पिवळी किंवा निळी फायबर केबल असते ती सैल झाली की नेट जातं. एकदा राऊटरच्या मागे जाऊन सगळ्या केबल घट्ट बसल्या आहेत का ते चेक करा.

4. मोबाईलचा एअरप्लेन मोड ऑन ऑफ करा

जर फक्त तुमच्याच मोबाईलमध्ये वाई-फाई चालत नसेल आणि बाकीच्यांच्या मोबाईलमध्ये चालत असेल, तर ही ट्रिक करा. तुमच्या मोबाईलचा एअरप्लेन मोड 5 सेकंदासाठी चालू करा आणि मग बंद करा. याने तुमच्या फोनचं नेटवर्क रिफ्रेश होतं आणि तो वाई-फाईचा सिग्नल परत पकडतो.

Ration Card PHH vs AAY: Ration Cardवर PHH की AAY? तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचं, महिन्याला किती किलो धान्य मिळतं लगेच तपासा

5. Forget Network करून परत कनेक्ट करा

ही पण भारी ट्रिक आहे. तुमच्या मोबाईलच्या वाई-फाई सेटिंगमध्ये जा. तुमच्या वाई-फाईच्या नावावर दाबून ठेवा. तिथे Forget Network असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. आणि मग परत तुमच्या वाई-फाईचं नाव शोधून पासवर्ड टाकून कनेक्ट करा. याने बऱ्याचदा IP चा जो घोळ असतो तो निघून जातो.

6. राऊटरची जागा बदला

अनेक लोक राऊटर कपाटात लपवून ठेवतात किंवा भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवतात. असं करू नका. वाई-फाईचे सिग्नल सगळीकडे जायला हवेत. राऊटर नेहमी घराच्या मधोमध आणि थोडा उंचावर ठेवा. खाली जमिनीवर ठेवू नका. भिंतीच्या मागे पण ठेवू नका. मोकळ्या जागी ठेवलं की स्पीड पण चांगला येतो.

Smartphone Hidden Button Tricks: फोनची 3 बटणं दाबण्याची योग्य ट्रिक माहीत आहे? ‘या’ Featuresमुळे काम होईल झटपट पटापट

7. किती मोबाईल कनेक्ट आहेत ते बघा

एकाच वाई-फाईवर घरातले 4 मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळं चालू असेल तर नेट स्लो होणारच. स्पीड सगळ्यात वाटला जातो. त्यामुळे जे वापरत नाहीत त्यांचं वाई-फाई बंद करा. आणि टीव्हीवर कोणी बघत नसेल तर त्याचं पण बंद करा.8. 5GHz वाला ऑप्शन वापरातुमच्या राऊटरमध्ये दोन नावं दिसत असतील, एक 2.4GHz आणि एक 5GHz. तर नेहमी 5GHz ला कनेक्ट व्हा. त्यावर स्पीड जास्त मिळतो. 2.4GHz वर घरातले दुसरे इलेक्ट्रॉनिक सामान जसं की मायक्रोवेव्ह याच्यामुळे अडथळा येतो. 5GHz एकदम क्लीन असतं.

Web Title: Wifi not working 8 easy ways to fix internet connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • free WiFi
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
1

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
2

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
3

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.