World Environment Day 2025: टेक्नोलॉजीही करू शकते पृथ्वीचं रक्षण, फक्त फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स
दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 च्या पर्यावरण दिनाची थीम एंड प्लास्टिक पॉल्यूशन अशी ठेवण्यात आली आहे. आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाने जोडलेले आहोत. स्मार्टफोनपासून टिव्हीपर्यंत आणि ऑनलाईन पेमेंटपासून ऑफीसच्या कामापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण या तंत्रज्ञानाच्या जगात देखील आपण पर्यावरण आणि पृथ्वी वाचवण्यासाठी मदत करू शकतो. यासाठी आपल्याला काही छोटे छोटे बदल आत्मसात करावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक कचरा सतत वाढत आहे आणि हा कचरा कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जुन्या गॅझेट्सचा पुर्नवापर करणं. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या जुन्या स्मार्टफोनचा सिक्योरिटी कॅमेरा, टीवी रिमोट, बेबी मॉनिटर किंवा स्मार्ट होम हबप्रमाणे वापरू शकता. याशिवाय एका मोठ्या टॅबलेटच्या स्क्रिनला आपण डिजिटल फोटो फ्रेमसारखं वापरू शकतो. आपल्या घरातील जुन्या टिव्हीचा वापर CCTV कॅमेरा मॉनिटरिंग सिस्टमसाठी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाल शक्य असल्यास तुमच्याकडे असलेले जुने गॅझेट्स जसं की लॅपटॉप, मॉनिटर इत्यादी अशा एखाद्या व्यक्तिला दान करा ज्याला या वस्तूंची गरज असेल. यामुळे केवळ त्या व्यक्तिची मदत होणार नाही तर इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं जाईल.
कोविड-19 महामारीदरम्यान डिजिटल सोलूशन्सचा वापर प्रचंड वाढला आहे. नोट्स असो किंवा रिमाईंडरसाठी आपण कागदाचा नाही तर डिजिटल राइटिंग पॅड किंवा स्मार्टफोनच्या नोट्स अॅप्सचा वापर करतो. यामुळे कागदाचा वापर कमी होतो. त्यामुळे झाडे वाचवण्यासाठी मदत होऊ शकते.
एसी आणि रेफ्रिजरेटर बहुतेकदा ओझोन अनुकूल कूलेंटचा वापर करतात. ही उपकरणे खरेदी करताना, R32 कूलेंट वाले एसी आणि R600a कूलेंट वाले रेफ्रिजरेटर पहा, कारण ते CFC आणि HFC पासून मुक्त आहेत. वीज वाचवण्यासाठी आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी किमान 4-स्टार किंवा 5-स्टार रेटिंग असलेली घरगुती उपकरणे खरेदी करा. जास्त रेटिंग असलेली उपकरणे वीज बिल कमी करण्यास देखील मदत करतील. यामुळे आपला देखील फायदा होतो. शिवाय पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.
आजकाल प्रत्येक स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि स्मार्टवॉच देखील USB-C-बेस्ड चार्जिंगला सपोर्ट करतात. याचा अर्थ एकच एडाप्टर आणि केबलचा वापर अनेक वेगवेगळे डिव्हाईस चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर तुमचा नवीन फोन चार्जरशिवाय येत असेल तर तुमच्या जुन्या डिव्हाइसचा चार्जर वापरा. प्रत्येक नवीन डिव्हाइससोबत नवीन चार्जर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी मदत होईल.