WWDC 2025 : Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26! लूक आणि नावासह झाले हे बदल
Apple च्या अॅनुअल डेवलपर इवेंट WWDC 2025 ची सुरुवात झाली आहे. हा ईव्हेंट 9 जूनपासून सुरु झाला आहे. अॅपलच्या या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या सॉफ्टवेअर्सवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स सादर केले आहेत. अॅनुअल डेवलपर ईव्हेंट WWDC 2025 मध्ये अॅपलने त्यांच्या आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम iOS साठी Liquid Glass डिझाईनसह iOS 26 सादर केलं आहे.
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c, किंमत 17 हजारांहून कमी! असे आहेत स्पेसिफिकेशन्स
कंपनीने सांगितलं आहे की, ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या iOS च्या नवीन डिझाईनमध्ये यूजर एक्सपीरियंसवर फोकस करण्यात आला आहे. कंपनीने सर्व अॅप्स आणि यूआईला पूर्णपणे रिडिझाईन केलं आहे. कंपनीने केवळ डिझाईनमध्येच नाही तर इतर अनेक अपडेट्समध्ये बदल केले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Apple ने ना केवळ आईओएसच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत तर कंपनीने कार इन्फोटेनमेंट सिस्टम Apple CarPlay ला देखील रिडिझाईन केलं आहे. Apple ने सफारी ब्राउझरला देखील अपडेट केलं आहे. कॉल अॅपमध्ये कंपनीने फेवरेट कॉन्टेक्टचा देखील पर्याय दिला आहे, ज्यामध्ये युजर्सना आता संपर्काशी संबंधित अधिक तपशील वरच्या बाजूला दिसतील.
या सर्व अपडेट्ससोबतच कंपनीने मेसेज अॅप देखील रिडाझाईन केलं आहे. यूजर्स प्रत्येक चॅटसाठी वेगवेगेळ्या बॅकग्राऊंडची निवड करू शकणार आहेत. यासोबतच मेसेजमध्ये पोल फीचर देखील जोडण्यात आलं आहे. याशिवाय लाईव्ह ट्रांसलेशन फीचरचा वापर करण्याची संधी देखील आता युजर्सना मिळणार आहे. Apple ने आयफोनच्या कॅमेरा अॅपमध्ये देखील अनेक बदल केले आहेत. आता युजर्सना कॅमेरा अॅपमध्ये फोटो आणि व्हिडीओसाठी ऑप्शन मिळणार आहे. अन्य कॅमेरा फीचर्स अॅक्सेस करण्यासाठी युजर्सना स्वाईप करावं लागणार आहे.
Apple ने iOS पासून MacOS पर्यंत त्यांच्या डिव्हाईसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नावात बदल केला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीन नावं आहेत, iOS26, WatchOS 26, tvOS26, MacOS26, VisionOS26, iPadOS 26.
WWDC 2025 ईव्हेंट कंपनीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. WWDC ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. याआधी 2023 मध्ये कंपनीने Vision Pro सादर केले होते. गेल्या वर्षी 2024 मध्ये अॅपलने AI फीचर्सवर फोकस केला होता आणि कंपनीने अॅपल इंटेलिजेंस देखील सादर केले होते. यावर्षी कंपनीचा फोकस यूजर्स एक्सपीरियंसवर आहे.