WWDC 2025: iPhone ची Android सोबत पुन्हा स्पर्धा, गुगलने तीन वर्षांपूर्वीच सादर केलेलं फीचर Apple युजर्ससाठी केलं लाँच
Apple ने WWDC 2025 मध्ये इनोवेटिव फीचर्ससह यूनिफाइड लेआउट सादर केले आहे, जो यूजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. कंपनीने iPhone च्या कोर Phone App मध्ये AI पावर्ड फीचर देखील दिले आहे, हे असे फीचर्स आहेत जे अँड्रॉइड युजर्स आधीपासूनच वापरत आहेत. या अपडेटसोबतच कंपनीने एक नवीन फीचर देखील सादर केलं आहे. टेक जायंट Apple ने लाँच केलेलं हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी Google ने 3 वर्षांपूर्वीच लाँच केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुगल आणि अँड्रॉईड युजर्समध्ये एक नवीन स्पर्धा सुरु झाली आहे.
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c, किंमत 17 हजारांहून कमी! असे आहेत स्पेसिफिकेशन्स
Apple ने सांगितलं आहे की, या नवीन अपडेटच्या मदतीने कंपनी यूजर्सचा अनुभव अधिक चांगला आणि कुशल बनवणार आहेत. लाईव्ह व्हॉईसमेल फीचरसह कंपनीने कॉल स्क्रीनिंग नावाचं एक नवीन फीचर देखील सादर केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स इनकमिंग कॉल्स अधिक चांगल्या पद्धतीने हँडल करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे फीचर AI पावरने सुसज्ज आहे. हे फीचर रियल टाइममध्ये कॉलरची माहिती स्टोअर करणार आहे आणि युजर्सना कॉल रिसीव्ह करावा की त्याकडे दुर्लक्ष करावं, याचा निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. हे फीचर अज्ञात किंवा अवांछित कॉल फिल्टर करण्यासाठी युजर्सची मदत करणार आहे. यासोबतच कंपनीने या ईव्हेंटमध्ये होल्ड असिस्ट फीचर देखील सादर केलं आहे. हे फीचर यूजर्सना नोटिफाय करणार आहे की, तुम्हाला ज्या व्यक्तिला कॉल करायचा आहे तो कॉलर कधी उपलब्ध होणार आहे. यामुळे होल्डवर असताना कॉलचे सतत निरीक्षण करण्याची गरज दूर होईल.
Call Screening फीचर चायनीज (चाइना मेनलँड, हाँग काँग, मकाऊ), इंग्लिश (यूएस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया, आयरलँड, न्यूजीलँड, सिंगापुर, साउथ अफ्रीका, यूके) फ्रेंच (कनाडा, फ्रांस), जर्मन (जर्मनी), जापानी (जापान), कोरियन (कोरिया), मॅनडरीन चाइनीज (चाइना मेनलँड, ताइवान, मकाऊ), पूर्तगाली (ब्राजील), आणि स्पेनिश (यूएस, मॅक्सिको, पुर्तो रिको, स्पेन) या भाषांना सपोर्ट करणार आहे.
Hold Assist फीचरबद्दल बोलायचं झालं तर हे फीचर इंग्रजी (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, सिंगापूर, यूके), फ्रेंच (फ्रान्स), स्पॅनिश (यूके, मेक्सिको, स्पेन), जर्मन (जर्मनी), पोर्तुगीज (ब्राझील), जपानी (जपान) आणि मंदारिन चायनीज (मुख्य भूभाग चीन) या भाषांना सपोर्ट करणार आहे.
Apple ने आयफोनच्या अॅप्समध्ये मोठा बदल केला आहे. फोन अॅपमधील बदलांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात नवीन यूजर इंटरफेससह अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवीन डिझाइनमध्ये व्हॉइसमेल आणि अलीकडील कॉन्टॅक्टसह आवडते संपर्क समाविष्ट आहेत. यासह, नेव्हिगेशन देखील खूप सोपे आहे. या नवीन डिझाइनसह, वापरकर्ते कॉल आणि संपर्क सहजपणे व्यवस्थापित करू शकतील.