Xiaomi 15 series: बहुचर्चित स्मार्टफोन सिरीजची अखेर भारतात एंट्री, DSLR पेक्षाही अँडवान्स Camera आणि हे आहेत कमाल फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज भारतात लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra चा समावेश आहे. हे स्मार्टफोन प्रीमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे.
Xiaomi ने ही स्मार्टफोन सीरिज यापूर्वीच जगातील बाजारात लाँच केली आहे. आता कंपनीने ही स्मार्टफोन सीरिज भारतात देखील लाँच केली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्मार्टफोन क्वालकॉमचे लेटेस्ट Snapdragon 8 Elite चिपसेट, Leica कॅमेरा, AI फीचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये देखील लाँच करण्यात आले आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi 15 स्मार्टफोन भारतात 64,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 15 Ultra स्मार्टफोन 1,09,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 15 Ultra Photography Kit Legend Edition भारतात 11,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
भारतात या स्मार्टफोन्सची प्री-बुकिंग 19 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासोबतच, कंपनीने 5,999 रुपयांच्या किंमतीत Xiaomi केअर प्लॅन लाँच केला आहे. यासोबतच, कंपनीने अल्ट्रा युजर्सना फोटोग्राफी किट लेजेंड एडिशन मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.
या नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला बँक ऑफर्स देखील दिल्या जाणार आहेत. बँक डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर, ICICI बँकेच्या ग्राहकांना अल्ट्रा स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांची सूट मिळेल. Xiaomi 15 स्मार्टफोन काळा, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यासोबतच, अल्ट्रा मॉडेल सिल्व्हर रंगात लाँच करण्यात आले आहे.
You don’t just buy an Ultra. You earn it.
The #Xiaomi15Ultra is here.Pre-booking starts on 19th March : https://t.co/IK6gtW6sCf#Xiaomi15Series #ThisIsIt pic.twitter.com/6KjPBENHk2
— Xiaomi India (@XiaomiIndia) March 11, 2025
Xiaomi 15 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा AMOLED मायक्रो-कर्व्ह्ड 2K डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 3200 निट्स आहे. हा डिस्प्ले HDR 10+, डॉल्बी व्हिजन आणि Xiaomi सिरेमिक ग्लास प्रोटेक्शन 2.0 ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite SoC देण्यात आला आहे.
नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने असा दावा केला आहे की डीएसएलआरपेक्षाही अॅडवान्स कॅमेरा देण्यात आला आहे. यात 200MP Leica पेरिस्कोप लेन्स, 50MP Leica प्रायमरी लेन्स, OIS सपोर्टसह 50MP Leica टेलिफोटो लेन्स आणि 50MP Leica अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. यासोबतच फोनच्या पुढच्या बाजूला 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Xiaomi 15 Ultra स्मार्टफोन Android 15 वर आधारित HyperOS 2 वर चालतो. यासोबतच, फोनमध्ये 5,410mAh बॅटरी आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये IP68 रेटिंग, डॉल्बी अॅटमॉस स्टीरिओ ड्युअल स्पीकर्स, NFC, 5G, अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 6.36-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, कमाल ब्राइटनेस 3,200 निट्स आहे, जो HDR10, HDR10+, डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो.
या Xiaomi फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे.
या फोनमध्ये 50MP LightHunter 900 प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 50MP 3.2x टेलिफोटो लेन्स आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP OmniVision OV32B40 फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये 5,240mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 15 वर आधारित HyperOS 2.0 वर चालतो. या शाओमी फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर्ससह IP68 रेटिंग, अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, NFC, डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट आहे.