POCO M7 5G: Airtel सोबत भागीदारी करत कंपनीने लाँच केलं स्मार्टफोनचं स्पेशल एडिशन, हे आहेत खास स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी POCO ने गेल्या आठवड्यात त्याचा नवीन स्मार्टफोन POCO M7 5G भारतात लाँच केला होता. हा नवीन स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या POCO M6 स्मार्टफोनचा उत्तराधिकारी आहे. हा नवीन स्मार्टफोन POCO M7 Pro स्मार्टफोनचा परवडणारा व्हेरिअंट आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे.
नवीनतम बजेट फ्रेंडली POCO M7 5G स्मार्टफोनची एक विशेष एडिशन एअरटेलच्या भागीदारीत लाँच करण्यात आली आहे. याआधीही, POCO ने एअरटेलच्या भागीदारीत भारतीय बाजारात परवडणारे 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. आता यामध्ये आणखी एका स्मार्टफोनचा समावेश झाला आहे.
POCO M7 5G एअरटेल एडिशन 9,249 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्पेशल एडिशनची विक्री 13 मार्चपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. त्यामुळे यात दोन दिवसातच ग्राहक या नवीन स्पेशल एडिशनची खरेदी करू शकणार आहेत. कंपनीने POCO M7 5G स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. यामध्ये मिंट ग्रीन, सॅटिन ब्लॅक आणि ओशन ब्लू यांचा समावेश आहे.
कंपनीने भारतात POCO M7 स्मार्टफोन 10,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. POCO M7 स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन फोन एअरटेल नेटवर्कने लॉक केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. या स्पेशल एडिशन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन वर नजर टाकुया.
POCO M7 5G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि रिझोल्यूशन 1,640 X 720 पिक्सेल आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 600 निट्स आहे.
स्पेशल एडिशन स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, हा POCO फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेटसह येतो, ज्यामध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी अॅड्रेनो जीपीयू आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या पोको फोनमध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे. यासोबतच फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या POCO फोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
POCO M7 5G स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, तो Android 14 वर आधारित HyperOS वर चालतो. कंपनी म्हणते की ते या फोनसाठी दोन वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि सुरक्षा अपडेट्स देईल. हा फोन 6GB/128GB आणि 8GB/128GB अशा दोन पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Pixel 9a Update: Google च्या आगामी स्मार्टफोनचा फोटो लीक, अशी असेल डिझाइन; कलर ऑप्शनही आले समोर
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात 5G, 4G LTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, और USB Type-C पोर्ट असेल.