
स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! मोठी बॅटरी, 200MP Leica कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर... Xiaomi 17 Ultra पाहताच यूजर्स झाले फिदा
Xiaomi 17 Ultra च्या 12GB रॅम + 512GB स्टोरेज वाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 90,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 16GB रॅम+512GB स्टोरेजवाल्या हायर-एंड ऑप्शनची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 96,000 रुपये ठेवली आहे. तसेच टॉप-ऑफ-द-लाइन 16GB रॅम+1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,09,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi 17 Ultra Leica एडिशनच्या 16GB रॅम+512GB स्टोरेज ऑप्शनची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,02,000 रुपये आणि 16GB रॅम+1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,15,000 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ऑफ व्हाइट शेड्समध्ये लाँच केला आहे. नवीन Xiaomi 17 Ultra चीनमध्ये 27 डिसेंबरपासून Xiaomi ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Xiaomi 17 Ultra Android 16-बेस्ड HyperOS 3 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,060 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि ड्रॅगन क्रिस्टल ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. हा फोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप ऑक्टा कोर 3nm स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला Adreno 840 GPU सह जोडण्यात आलं आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x Ultra रॅम आणि 1TB UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 1-इंच सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेल LOFIC Omnivision 1050L प्रायमरी शूटर आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल Samsung JN5 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील आहे, जो 3.2x ते 4.3x कंटीन्यूअस ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. हा फोन 4K रेजोल्यूशनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 50-मेगापिक्सेल OV50M सेल्फी कॅमेरा देखील आहे.
नवीन Xiaomi 17 Ultra मध्ये 6,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, एक USB टाइप-C पोर्ट, NFC, Wi-Fi 7 आणि ब्लूटूथ 5.4 सपोर्ट दिला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी यामध्ये IP66 + IP68 + IP69 रेटिंग आहे. या हँडसेटमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.
Ans: किफायतशीर किंमत आणि दमदार फीचर्समुळे Xiaomi फोन भारतात लोकप्रिय आहेत.
Ans: रेडमी, रेडमी नोट, शाओमी (फ्लॅगशिप) आणि पोको.
Ans: मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.