
Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक... या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
यावर्षी कंपनीने iPhone SE लाइनअप पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने यावर्षीच्या सुरुवातीलाच ही लाईनअप बंद केली आणि याला iPhone 16e सोबत रिप्लेस केलं. तसेच कंपनीने आयफोन प्लसला देखील रामराम केलं. यावर्षी कंपनीने एकूण 25 प्रोड्क्टस बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपलने 2016 मध्ये लाँच करण्यात आलेला iPhone SE यावर्षी पूर्णपणे बंद केला. याशिवाय कंपनीने iPhone Plus मॉडेल देखील अल्ट्रा-थिन आयफोन एयरसोबत रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या आयफोन 16 प्लस विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र कंपनीने आयफोन 14 प्लस आणि आयफोन 15 प्लस पूर्णपणे बंद केला आहे. याशिवाय, यावर्षी आयफोन 14, आयफोन 15 देखील कंपनीने बंद केले आणि 16 प्रो मॉडेल्सऐवजी आयफोन 17 प्रो मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध झाले.
अॅपलने यावर्षी M4 चिप वाल्या आयपॅड प्रोला M5 चिपने रिप्लेस केले. याप्रमाणेच M2 वाल्या आयपॅड एयरऐवजी M3 चिपवाला मॉडेल लाँच करण्यात आला. आयपॅड 10 च्या जुन्या वर्जनला बंद करून कंपनीने नवीन मॉडेल A16 चिपसह लाँच केला.
Year Ender 2025: रोलेबल लॅपटॉपपासून स्लिम आयफोनपर्यंत… यावर्षी लाँच झाले हे युनिक गॅजेट्स
अॅपलने 2025 मध्ये M2 Max आणि M2 Ultra चिपसह लाँच करण्यात आलेले मॅक स्टूडियो, M4 चिसह लाँच करण्यात आलेले 14 इंचाचे मॅकबुक प्रो, M3 चिपसह लाँच करण्यात आलेले 13 आणि 15 इंचाचे मॅकबुक एयर आणि M2 चिपसह लाँच करण्यात आलेले 12 इंचाचे मॅकबुक एयर देखील आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅपलने यावर्षी वॉच अल्ट्रा 2, वॉच सीरीज 10, वॉच SE 2 सह एयरपॉड्स प्रो 2, M2 चिपवाले अॅपल विजन प्रो, Qi 2 सपोर्टवाले मॅग्सेफ चार्जर, 30W USB-C पॉवर एडेप्टर, लाइटनिंग टू 3.5mm ऑडियो केबल आणि मॅग्सेफ टू मेग्सेफ 2 कन्वर्टर देखील बंद करण्याचा निर्णय घेतला.
Ans: स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक आणि रोनाल्ड वेन यांनी 1976 मध्ये स्थापना केली.
Ans: आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अॅपल वॉच, एअरपॉड्स.
Ans: iOS अॅप्स डाउनलोड करण्यासाठी अधिकृत अॅप स्टोअर.