
Year Ender 2025: झूम, नाईट मोड, पोर्ट्रेट…सर्वकाही मिळणार! 2025 मधील हे 5 स्मार्टफोन्स फोटोग्राफीमध्ये आहेत ‘बेस्ट’
डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी एक उत्तम पर्याय मानला जात आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Vivo X300 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेंसिटी 9500 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 50MP चा प्रायमरी लेंस, 50MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 200MP चा पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,09,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात भारतात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच 2K रेजॉल्यूशनवाला डिस्प्ले आणि Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. रियलमीने जापानी इमेजिंग ब्रँड Ricoh सह मिळून या स्मार्टफोनची कॅमेरा सिस्टिम डेव्हलप केली आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा, 200MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 50MP चा अल्ट्रावाइड सेंसर देण्यात आला आहे. हा सेटअप 8K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 72,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेली आयफोन 17 सिरीजमधीस iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max व्यावसायिक प्रोफेशनल व्हिडिओ क्रिएटर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या मॉडेल्समध्ये कंपनीने ProRes RAW व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील जोडले आहे. आय़फोनमध्ये देण्यात आलेल्या DaVinci Resolve सारख्या सॉफ्टवेअरचा वापर एडीटींगसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये 8x लॉसलेस झूमसह 50MP 4x टेलिफोटो कॅमेरा आहे.
Oppo Find X9 Pro चा कॅमेरा देखील यावर्षी चर्चेत होता. या स्मारक्टफोनमध्ये 200MP टेलिफोटो कॅमेरा, 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. नैसर्गिक टोन, उत्कृष्ट डायनॅमिक रेंज आणि शार्पनेससह फोटो पाहिजे असतील तर तुम्ही या स्मार्टफोनची निवडकरू शकता. या स्मार्टफोनमध्ये 7,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Pixel 10 Pro XL मध्ये 50MP वाइड कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5x 48MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आसा आहे. जर तुम्हाला स्थिर, स्पष्ट आणि नैसर्गिक फोटो आवडत असतील तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगली निवड ठरू शकतो.
Ans: ज्यात मोठा सेन्सर, OIS (Optical Image Stabilization), चांगला Night Mode आणि AI इमेज प्रोसेसिंग असते असे फोन फोटोग्राफीसाठी बेस्ट मानले जातात.
Ans: नेहमीच नाही. सेन्सर साईज, लेंस क्वालिटी आणि सॉफ्टवेअर प्रोसेसिंग हे मेगापिक्सेलपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात.
Ans: OIS हार्डवेअरवर आधारित असून फोटो/व्हिडिओ स्थिर ठेवते, तर EIS सॉफ्टवेअरद्वारे व्हिडिओ स्टेबल करते