BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे
कंपनीने डिसेंबरमध्येच या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 हजारांहून कमी रुपयांत 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये अनेक जबरदस्त फायदे देखील मिळणार आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनीच्या ज्या यूजर्सना कमी पैशांत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सारखे फायदे पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी कंपनीने हा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने अलीकडेच भारतात 4G सर्विस लाँच केली आहे. यासाठी कंपनीने सुमारे 1 लाख नवीन टॉवर देखील लावले आहे, जे 5G रेडी आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL च्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 997 रुपये आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनची किंमत 1 हाजारांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाते. त्यामुळे ग्राहकांना संपूर्ण भारतात फ्री नेशनल रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. एवढंच नाही, BSNL त्यांच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा फायदा मिळणार आहे. याप्रकारे यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 300GB डेटाचा लाभ मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन देशातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे.
याशिवाय कंपनीकडे यूजर्ससाठी 165 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारा प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना अनेक फायदे ऑफर केले जातात. भारत संचार निगम लिमिटेडचा हा प्लॅन 897 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये 24GB डेटासह डेली 100 फ्री SMS ऑफर केले जाणार आहेत. कंपनीचा हा प्लॅन अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना कमी पैशांत त्यांचे सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे.
Ans: होय. BSNL च्या अनेक प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (लोकल + STD) सुविधा दिली जाते.
Ans: होय. काही BSNL प्लॅनमध्ये दररोज 1GB ते 3GB डेटा दिला जातो.
Ans: सध्या BSNL ची 5G सेवा कमर्शियल स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र 4G नेटवर्क विस्ताराचे काम सुरू आहे.






