
Vivo Y31d: मार्केटमध्ये आला नवा बादशाह! 7,200mAh बॅटरीने मिटवली चार्जिंगची समस्या, गेमिंगपासून कॅमेऱ्यापर्यंत सर्वच भारी
Vivo Y31d ची किंमत वियतनाममध्ये 26,399 रुपये आहे. हा हँडसेट ग्लो व्हाइट आणि स्टारलाइट ग्रे अशा दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. Vivo Y31d स्मार्टफोन कंपनीच्या कंबोडिया आणि वियतनाम वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच LCD स्क्रीन दिली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 256PPI पिक्सल डेंसिटी आणि 1,250 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रैगन 6s 4G Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 6GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo Y31d मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी लेंस मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, डुअल-बँड वाय-फाय, USB 2.0, GPS, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, यूएसबी ओटीजी आणि यूएसबी टाइप-C पोर्ट दिला आहे. एवढंच नाही तर विवोच्या हँडसेटमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP68 + IP69 + IP69+ रेटिंग दिली आहे. Vivo Y31d स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Vivo चे बहुतांश स्मार्टफोन भारतातच, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील प्लांटमध्ये तयार केले जातात.
Ans: Vivo स्मार्टफोनमध्ये Funtouch OS (Android आधारित) वापरला जातो. काही मॉडेल्समध्ये Origin OS देखील मिळतो.
Ans: Vivo स्मार्टफोनची किंमत साधारणतः ₹8,000 पासून सुरू होऊन ₹50,000+ पर्यंत जाते (मॉडेलवर अवलंबून).