
Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत... हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स
अॅपलने यावर्षाच्या सुरुवातीला iPhone 16e लाँच केला होता. परवडणारी किंमत, सॉलिड बिल्ड क्वालिटी आणि दिर्घकाळ सॉफ्टवेयर सपोर्ट या कारणांमुळे हा आयफोन यूजर्सना प्रचंड आवडेल अशी कंपनीला आशा होती. मात्र असं झालं नाही. या आयफोनला यूजर्सचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. जुनी डिझाईन, लिमिटेड कलर ऑप्शन आणि बेसिक कॅमरा सेटअप या कारणांमुळे या आयफोनने लोकांचे लक्ष वेधलं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 16e व्यतिरिक्त अॅपलने लाँच केलेला iPhone Air देखील त्याची कमाल दाखवू शकला नाही. कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सिरीजसह iPhone Air लाँच केला होता. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन मॉडेल होता. मात्र अल्ट्रा-स्लिम डिझाईन असून देखील हा आयफोन यूजर्सची मनं जिंकण्यात अयशस्वी ठरला. ज्यामुळे कंपनीने या मॉडेलचे प्रोडक्शन देखील कमी केले.
सॅमसंगने यावर्षी अल्ट्रा-थिन स्मार्टफोन सेगमेंटची सुरुवात केली आणि Galaxy S25 Edge लाँच केला. स्लिम डिझाईनमुळे हा स्मार्टफोन लोकांना आवडेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली होती. मात्र हा स्मार्टफोन फ्लॉप ठरला. विक्री कमी झाल्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे प्रोडक्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच या मॉडेलचे पुढील व्हेरिअंट लाँच करण्याचा प्लॅन देखील रद्द केला. सॅमसंगने सांगितले की ते संपूर्ण Edge लाइनअप बंद करत आहे.
अॅपल आणि सॅमसंगप्रमाणे नथिंगच्या Phone 3 ने देखील ग्राहकांना निराश केलं. कंपनीने यामध्ये विजुअल एक्सपेरिमेंट करण्यासाठी ट्रांसपेरेंट डिझाईन लँग्वेज सादर केली. नवीन ग्लिफ मॅट्रिक्ससह हा स्मार्टफोन मार्केटमध्ये हिट होण्याची शक्यता होती. मात्र असं झालं नाही. जास्त किंमत आणि कॅमेराची गुणवत्ता उच्च दर्जाची नसल्यामुळे, ग्राहकांना स्मार्टफोन फारसा आवडला नाही.