
Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले 5 सर्वात स्मार्ट AI फोन; कॅमेरा, परफॉर्मेंस आणि फीचर्समध्ये कोण आहे नंबर 1?
Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
सॅमसंगने यावर्षी Galaxy AI आणखी दमदार बनवले. कंपनीने यावर्षी 1,08,999 रुपयांच्या किंमतीत Samsung Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन या वर्षातील एक सर्वात मोठा अपग्रेड आहे. सर्वात मोठे अपग्रेड म्हणजे एआय सिलेक्ट साइडबार, जिथे टेक्स्ट मजकूर निवडल्याने Writing Assist उघडते आणि फोटोवर टॅप केल्याने जनरेटिव्ह एडिटिंग टूल्स सक्रिय होतात. गॅलेक्सी स्मार्टफोनच्या खास फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर फोटोमध्ये रिफ्लेक्शन हटवणं, शॅडो करेक्शन, फ्रेम एक्सपेंड करणं, ऑब्जेक्ट हटवणं, इत्यादी. ज्या लोकांना परफेक्ट फोटोची गरज असते, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गूगल ने Pixel 10 मध्ये पहिल्यांदा AI ला पूर्णपणे ऑन-डिवाइस केलं आहे. म्हणजेच तुमची प्रायव्हसी पूर्णपणे सुरक्षित राहणार आणि AI देखील सुपर-फास्ट होणार. या स्मार्टफोनमध्ये मॅजिक क्यू आहे, जो मेसेज, अॅप्स आणि ईमेल्समधील महत्त्वाच्या गोष्टी स्वत: शोधून यूजर्सच्या समोर ठेवतो. यामध्ये पिक्सेल जरनल आहे, जे तुमच्या दिनचर्येवर आधारित आधारित कंटेंट आणि प्लॅनिंग सुचवते. कॅमेरा कोच यूजर्सना योग्य अँगल, बॅकग्राऊंड आणि फ्रेमिंग शिकवते. या स्मार्टफोनची किंमत 69,500 रुपये आहे.
iQOO 15 मध्ये OriginOS 6 सह अनेक अॅडवांस्ड AI फीचर्स देण्यात आले आहे, ज्यामुळे फोनचा परफॉर्मंस सुधारतो. या स्मार्टफोनची किंमत 72,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये AI Note Assist आणि AI Translation आहे. फोनमध्ये स्लीप मोड आहे, जे रात्री बॅटरीची बचत करते. फोनमध्ये एआय रीटच, रिफ्लेक्शन इरेज, फोटो एक्सपांड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
OnePlus ने नेहमीप्रमाणे प्रॅक्टिकल AI वर अधिक फोकस केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कोणतंही असं फीचर नाही जे ओवरहाइप वाटावे. प्रत्येक फीचर यूजर्सच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहे. फोनमध्ये एआय प्लस माइंड आहे जे फोटो किंवा डॉक्यूमेंटने थेट कॅलेंडरमध्ये डिटेल्स जोडतो. एआय व्हॉइस स्क्राइब कॉल रेकॉर्ड करून त्याचा सारांश बनवतो. कॉल असिस्टंट लाईव्ह कॉल ट्रांसलेशनसाठी मदत करतो. या स्मार्टफोनची किंमत 63,999 रुपये आहे.
Oppo ने ColorOS 16 मध्ये AI एका नव्या रुपात सादर केले आहे. Oppo Find X9 स्मार्टफोनमध्ये एआय पोर्ट्रेट ग्लो, एआय सारांश आणि लेखक, एआय लिंकबूस्टने स्मूद नेटवर्क असे फीचर्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत 74,999 रुपये आहे. फोटो एडिटिंग, प्रोडक्टिविटी आणि स्मार्ट टूल्स पाहिजे आहेत, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट आहे.
Ans: 2025 मध्ये बजेट ते मिड-रेंज सेगमेंटमध्येही खूप पर्याय आहेत, जसे की Vivo Y300t, iQOO Neo 10, POCO सीरिज, Realme मधील 60X किंवा 80 Series इत्यादी
Ans: Apple, Samsung, Vivo, Huawei, ASUS, Oppo, Realme, iQOO, Motorola, OnePlus हे 2025 मध्ये नवीन मॉडेल्स आणि सीरिज केल्या आहेत.
Ans: बहुतेक नवीन मॉडेल्स 5G सपोर्टसह लाँच झाले. जसे iPhone 17 Series, Vivo Y400 5G, Vivo Y300t 5G, इत्यादी.