Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
नवीन फीचरमुळे रिल्स पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर आता तुम्हाला रिल्स पाहताना एक-एक करून रील्स स्क्रोल कराव्या लागणार नाहीत. कारण हे फीचर आपोआप रिल्स स्क्रोल करण्याचं काम करणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झालं तर, आता तुम्ही फोनला हात न लावता देखील इंस्टाग्रामवर रिल्स पाहू शकणार आहात. हे फीचर यूजर्सना ऑन करावं लागणार आहे. तुम्ही हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला हाताने रिल्स स्क्रोल करण्याची गरज नाही. तुम्ही हे फीचर ऑन केल्यानंतर रिल्स आपोआप स्क्रोल होणार आहेत आणि तुम्हीही कुठेही फोन ठेऊन रिल्सचा आनंद घेऊ शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
बऱ्याच काळापासून इंस्टाग्रामवर या फीचरची चर्चा सुरु होती. आता अखेर यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. या फीचरच्या नावाप्रमाणेच, समजू शकतं की, हे फीचर यूजर्ससाठी बरंच फायद्याचं ठरणार आहे. आता रिल्स स्क्रोल करण्यासाठी यूजर्सना हातांचा वापर करण्याची गरज नाही. ऑटो स्क्रॉल फीचर ऑटो स्क्रॉलिंगचं काम करणार आहे. हे फीचर खास रील्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर रिल्स बदलण्यासाठी फोन वरच्या बाजूला स्क्रॉल करण्याची गरज नाही. हे फीचर चालू केल्यानंतर, तुम्ही फोन कुठेही ठेवून रील्स पाहू शकाल.
इंस्टाग्रामवर एकदा ऑटो स्क्रॉल फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला रिल्स पाहताना हाताने स्क्रीन वरच्या बाजूला स्वाईप करण्याची गरज नाही. हे काम अॅपमध्ये आपोआप केलं जाणार आहे. जेव्हा तुम्ही अॅपच्या सेटिंग्जमध्ये ऑटो-स्क्रोल फीचर चालू करता, तेव्हा रील संपल्यानंतर स्क्रीन वरच्या बाजूला स्वाईप केली जाणार आणि एक नवीन रील आपोआप सुरू होईल. अशा प्रकारे, तुमचा फोन हातात नसला तरीही तुम्ही रीलचा आनंद घेऊ शकता. हे फीचर विशेषतः हिवाळ्यात फायद्याचं ठरणार आहे, जेव्हा यूजर्स त्यांचे हात खिशात ठेवून रील्सचा आनंद घेऊ शकतील.
Ans: तुमच्या पोस्टशी संबंधित, कमी स्पर्धेचे आणि target audience शी जुळणारे हॅशटॅग निवडावेत.
Ans: होय, दर्जेदार कंटेंट, योग्य captions, keywords आणि engagement यावर आता reach जास्त अवलंबून आहे.
Ans: स्पॅम कंटेंट कमी करण्यासाठी आणि दर्जेदार पोस्टला जास्त reach मिळावा यासाठी Instagram ने हॅशटॅग्सच्या वापरावर मर्यादा आणली आहे.






