Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा 'हे' बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
भारतात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीला सर्वत्र दिवे लावले जातात. कंदील लावले जातात. घराबाहेर रांगोळी काढली जाते. दिवाळीला लोकं नवीन कपडे घालून आणि मेकअप करून फोटो क्लिक करतात. पण बेस्ट फोटो क्लिक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो स्मार्टफोनचा कॅमेरा. तुम्ही चांगले कपडे घातले आणि मेकअप केला पण तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेराच चांगला नसेल तर?
काही स्मार्टफोनचे कॅमेरा DSLR सारखी क्वालिटी ऑफर करतात. ज्यामुळे युजर्स बेस्ट फोटो क्लिक करू शकतात. काही युजर्स स्मार्टफोन केवळ त्यांच्या कॅमेऱ्यासाठी खरेदी करतात. तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीत बेस्ट कॅमेऱ्यावाल्या स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. या स्मार्टफोनचा कॅमेरा तगडा आहे. त्यामुळे युजर्स या स्मार्टफोनवरून DSLR सारखे फोटो क्लिक करू शकणार आहेत. हे फोटो तुम्ही सोशल मीडिया अपलोड केल्यास लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगचा फ्लॅगशिप Galaxy S25 Ultra स्मार्टफोन 4 रियर कॅमेऱ्यांसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी सेंसर, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (5x जूम), 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 10MP टेलीफोटो कॅमेरा (3x जूम) देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने क्लिक केलेले फोटो DSLR कॅमेऱ्याला टक्कर देतात.
Apple चा iPhone 17 Pro त्याच्या कॅमेऱ्या क्वालिटीसाठी ओळखला जातो. या स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर, 48MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (4x झूम) आणि 48MP अल्ट्रा वाइड लेंस ऑफर करतो. यासोबतच या आयफोनचा 18MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगचा उत्तम अनुभव ऑफर करतो.
Google Pixel 10 Pro त्याच्या नेचुरल फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. यामध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर, 48MP पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर (5x झूम) आणि 48MP अल्ट्रा वाइड लेंस शामिल समाविष्ट आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 42MP चा कॅमेरा देण्यात आला आहे, जो शार्प आणि क्लियर सेल्फीसाठी परफेक्ट आहे.
iPhone 16 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48MP चा मुख्य सेंसर, 48MP अल्ट्रा वाइड लेंस आणि 12MP टेलीफोटो लेंस यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Apple च्या फँससाठी एक प्रीमियम ऑप्शन आहे.
Diwali 2025: फक्त मिठाई नाही, या 4 स्मार्ट गिफ्ट्सने तुमच्या प्रियजनांची दिवाळी करा आणखी खास
OnePlus 13 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP प्रायमरी लेंस, 50MP अल्ट्रा वाइड लेंस (120°) आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (3x झूम) यांचा समावेश आहे. तसेच, 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी उत्तम आहे.