Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?
गुगल अकाऊंट युजर्सना ड्राइव स्टोरेजची गरज असते. कोणत्याही प्रकारचा डेटा, फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी ड्राइव स्टोरेज नेहमी कमी पडते. आता दिवाळीपूर्वी युजर्सचं हे टेंशन दूर करण्यासाठी गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सणावेळी, फोटो काढताना तुम्हाला स्टोरेजची काळजी करावी लागणार नाही. कारण गुगल त्यांच्या युजर्ससाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आला आहे. या ऑफरअंतर्गत अत्यंत कमी किमतीत भरपूर स्टोरेज मिळणार आहे. म्हणून, जर तुम्हाला गुगल ड्राइव्ह स्टोरेजची आवश्यकता असेल, तर ही संधी गमावू नका.
Diwali 2025: फक्त मिठाई नाही, या 4 स्मार्ट गिफ्ट्सने तुमच्या प्रियजनांची दिवाळी करा आणखी खास
टेक जायंट कंपनी गुगलने त्यांच्या युजर्ससाठी दिवाळीनिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनीने त्यांच्या Google One Cloud Storage च्या किंमती प्रचंड कमी केल्या आहेत. ही ऑफर लिमीटेड काळासाठी लाँच करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता युजर्स केवळ 11 रुपयांत 2TB पर्यंत क्लाउड स्टोरेज खरेदी करू शकणार आहे. हा प्लॅन खरेदी केल्यामुळे युजर्सचा प्रचंड फायदा होणार आहे. कारण या प्लॅनसोबत युजर्सना Google Drive, Google Photos आणि इतर AI फीचर्सचा देखील एक्सेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही स्पेशल दिवाळी ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजेच जर तुम्हाला जर या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. गुगलच्या या ऑफरअंतर्गत 30GB पासून 2TB पर्यंत कोणत्याही प्लॅनची निवड करू शकतात. प्रत्येक प्लॅनची किंमत पहिल्या तीन महिन्यांसाठी केवळ 11 रुपये असणार आहे. म्हणजेच सुरुवातीच्या 90 दिवसांसाठी एकून खर्च केवळ 33 रुपये होणार आहे. यानंतर, निवडलेल्या प्लॅनची किंमत सामान्य दरावर परत येईल.
Google One अनेक स्टोरेज टियर प्रदान करतो, जो वेगवेगळ्या गरजांनुसार तयार केला जातो. प्रत्येक प्लॅनची मंथली किंमत वेगवेगळी असते. मात्र जर युजर्सनी वार्षिक सब्सक्रिप्शन खरेदी केले तर युजर्सना सुमारे 37 टक्के बचत करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे दीर्घकाळ सुरक्षित ठेवायची आहेत.
OnePlus ने लाँच केलं Android 16 बेस्ड OxygenOS 16, आता Apple प्रोडक्ट्सने कनेक्ट होणार डिव्हाईस