Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?
Flipkart Big Billion Days Sale 2025 ची सुरुवात 23 सप्टेंबरपासून होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच अगदी घरगुती वस्तूंपासून ते गॅझेट्सपर्यंत ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अनेक वस्तू खरेदी करू शकतात. सध्या सर्वत्र या सेलची चर्चा सुरु आहे आणि ग्राहक अगदी आतुरतेने या सेलची वाट बघत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, येत्या काहीच दिवसांचत सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. या सेलमध्ये ग्राहक Samsung Galaxy S24 Ultra हा केवळ 59,990 रुपयांत खरेदी करू शकतात.
Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने त्यांच्या आगामी Flipkart Big Billion Days Sale 2025 ची घोषणा केली आहे. हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कंपनीच्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, पीसी, लॅपटॉप, ईयरफोन आणि स्मार्ट होम अप्लायंसेस सारख्या अनेक वस्तू कमी किंमतीत आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra वर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. यामध्ये बँक ऑफर्सचा देखील समावेश असणार आहे. परंतु आतापर्यंत फ्लिपकार्टने सॅमसंग स्मार्टफोनवरील ऑफर्स अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत. ग्राहकांना कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस देखील मिळू शकेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
Desidime.com वरील एका पोस्टनुसार, Samsung Galaxy S24 Ultra फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजसेल दरम्यान केवळ 59,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लॅगशिप Galaxy S सीरीज मॉडल अंतर्गत कंपनीने हे डिव्हाईस 2024 मध्ये लाँच केले होते. मात्र आता या डिव्हाईसच्या किमतीत ही मोठी घट असल्याचे मानले जात आहे. ही डील 12GB + 256GB व्हेरिएंटवर लागू होईल. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
लीक झालेल्या डीलमध्ये असं सांगितलं आहे की, Samsung Galaxy S24 Ultra च्या या किंमतीत सेल डिस्काउंट, बँक ऑफर आणि इतर कूपन डिस्काउंटचा देखील समावेश असू शकतो. तथापि, वाचकांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी ही बातमी फारशी गांभीर्याने घेऊ नये कारण फ्लिपकार्टने अद्याप सॅमसंग स्मार्टफोनवरील ऑफर्स अधिकृतपणे जाहीर केलेल्या नाहीत.
Galaxy S24 Ultra च्या बेस 12GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये आणि 12GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 1,59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस टाइटेनियम ब्लॅक, टाइटेनियम ग्रे, टाइटेनियम वायलेट आणि टाइटेनियम येलो शेड्समध्ये उपलब्ध आहे.