HMD Vibe 5G: स्वस्तात मस्त! 8,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा 5G फोन, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
HMD ने भारतात पुन्हा एका नवा धमाका केला आहे. कंपनीने भारतात HMD Vibe 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. गुरुवारी कंपनीने या स्मार्टफोनसोबत HMD 101 4G आणि HMD 102 4G फीचर फोन देखील लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेला HMD Vibe 5G हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 5G कनेक्टिविटी, 50-मेगापिक्सल रियर कॅमेरा, 8-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच कंपनीने एक वर्षांची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील दिली आहे. कंपनीने लाँच केलेल्या HMD 101 4G आणि HMD 102 4G मध्ये 2-इंच QQVGA डिस्प्ले, 1,000mAh बॅटरी आणि कलर-मॅच्ड कीपॅड दिले आहे. HMD 102 4G मॉडलमध्ये QVGA कॅमेरा आणि LED फ्लॅश देखील दिला आहे.
HMD Vibe 5G ची किंमत भारतात 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या या स्मार्टफोनची स्पेशल फेस्टिव प्राइस 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. HMD 101 4G आणि HMD 102 4G ची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 1,899 रुपये आणि 2,199 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन देशात HMD India वेबसाइट, चुनिंदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि रिटेल स्टोर्सद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. HMD Vibe 5G हा स्मार्टफोन ब्लॅक आणि पर्पल कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे. यामध्ये एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आणि इन-बॉक्स केस यांचा समावेश आहे. HMD 101 4G डार्क ब्लू, पर्पल आणि रेड शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, तर HMD 102 4G डार्क ब्लू, पर्पल आणि रेड फिनिशमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
HMD Vibe 5G मध्ये 6.67-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो आहे. हा हँडसेट ऑक्टा-कोर 6nm Unisoc T760 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याच्यासोबत 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला microSD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन स्टॉक Android 15 वर चालतो आणि दोन वर्षांसाठी तिमाही सुरक्षा अपडेट्स मिळतील.
कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी रियर सेंसर, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आणि LED फ्लॅश यांचा समावेश आहे. फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा सेल्फी आणि वीडियो कॉल्ससाठी देण्यात आला आहे. HMD Vibe 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि चार्जर बॉक्समध्येच दिला जाणार आहे.
भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, GLONASS आणि USB Type-C पोर्ट आहे. यात 3.5mm ऑडिओ जॅक, स्टीरिओ स्पीकर्स आणि नोटिफिकेशन लाईट देखील आहे. सुरक्षेसाठी बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा आकार 165×75.8×8.65 मिमी आहे आणि त्याचे वजन 190 ग्रॅम आहे.