केवळ 10 मिनिटांत घरी पोहोचणार Jio चे फीचर फोन्स, 95 शहरांमध्ये कंपनीची सर्विस सुरु! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये
नवीन फोन खरेदी करायचा असेल तर आपल्याला दुकानात जावं लागतं किंवा आपण कंपनीच्या वेबसाईट आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील फोन खरेदी करू शकतो. पण ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर फोनच्या डिलीव्हरीसाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. पण आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा सर्विसबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फोन ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत फोनची डिलीव्हरी मिळणार आहे. भारतातील युजर्सना जिओ हँडसेटची फास्ट डिलीव्हरी मिळावी, या उद्देशाने ही सर्विस सुरु करण्यात आली आहे. कंपनीने ही सर्विस भारतातील 95 शहरांमध्ये सुरु केली आहे.
नव्या अवतारात लाँच झाली OnePlus Nord सिरीज…पावरफुल बॅटरीसह मिळणार अनेक कमाल फीचर्स! किंमत केवळ इतकी
क्विक डिलीवरी प्लॅटफॉर्म Swiggy Instamart निवडक शहरांत JioBharat V4 आणि JioPhone Prima 2 ची केवळ 10 मिनिटांत डोरस्टेप डिलीवरी करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, जिओच्या फीचर फोनची डिलीव्हरी मिळण्यासाठी आता केवळ 10 मिनिटांचा वेळ लागणार आहे. Instamart आधीपासूनच Apple, Samsung, OnePlus आणि Redmi सारख्या ब्रँड्सच्या निवडक स्मार्टफोनची केवळ 10 मिनिटांत डिलीव्हरी करतो. यामध्ये आता जिओच्या फीचर फोनचा देखील समावेश केला जात आहे. म्हणजेच आता इतर ब्रँडच्या स्मार्टफोनसोबतच ग्राहकांना जिओच्या फीचर फोनची देखील डिलीव्हरी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मंगळवारी एका प्रेस रिलीजमध्ये Instamart ने घोषणा केली आहे की, त्यांनी Reliance Jio सह पार्टनरशिप करत भारतातील 95 शहरांमध्ये एक नवीन सर्विस सुरु केली आहे. या सर्विसमध्ये कंपनी Jio मोबाईल फोन्सची केवळ 10 मीनिटांत डोरस्टेप डिलीव्हरी करणार आहे. या भागिदारीअंतर्गत, JioBharat V4 आणि JioPhone Prima 2 इंस्टंट डिलीव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
JioBharat V4 ची किंमत 799 रुपये आहे. तर JioPhone Prima 2 ची किंमत 2,799 रुपये आहे. या फोनच्या डिलीव्हरीसाठी आता केवळ 10 मिनिटांचा वेळ लागणार आहे. Instamart ने यावर्षीच्या सरुवातीला iPhone 16e आणि Samsung Galaxy M35 सारख्या निवडक स्मार्टफोनची क्विक डिलीव्हरी सुरु केली आहे. ही सर्विस बंगळुरु, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे.
JioBharat V4 ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा एक 4G फीचर फोन आहे, ज्यामध्ये इंटरनेट एक्सेस आणि 1,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये JioPay द्वारे UPI पेमेंट्स आणि इंटीग्रेटेड साउंडबॉक्स आहे. फोनमध्ये 128GB पर्यंत एक्सपँडेबल स्टोरेज आणि 23 भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये JioTV अॅप आणि JioChat सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
JioPhone Prima 2 सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 2.4-इंच डिस्प्ले, 4GB ऑनबोर्ड स्टोरेज आणि माइक्रोSD कार्डद्वारे 128GB एक्सपँडेबल मेमोरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोन JioPay द्वारे UPI पेमेंट्स आणि 2,000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये YouTube, Facebook, आणि Google Voice Assistant प्रीलोडेड आहेत. यासोबतच फोनमध्ये JioTV, JioCinema, आणि JioSaavn चा अॅक्सेस देखील देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 23 भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन Qualcomm चिपसेटवर चालतो.