जनगणना कायदा १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, प्रभावी धोरणनिर्मिती व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वसनीय माहितीचा (डेटा) संग्रह अत्यावश्यक आहे.
Census 26-2027 Update: केंद्रीय गृह मंत्रालयाने २६-२०२७ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांनी नियम आणि वेळापत्रक जाहीर केले आहे.
जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गृह मंत्रालयाने आज, सोमवारी, जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.