सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
कोमट पाण्याचे शरीराला होणारे वैज्ञानिक फायदे?
कोणत्या वेळी कोमट पाणी पिणे फायदेशीर?
सकाळी झोपेतून उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची सकाळ ही वेगवेगळी असते. उठल्यानंतर काहींना ब्लॅक कॉफी लागतो तर काहींना पहाटे लवकर योगा, व्यायाम करायला खूप जास्त आवडतो. सकाळच्या वेळी फॉलो केलेल्या चांगल्या सवयी शरीरासाठी खूप जास्त गुणकारी ठरतात. दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहात होण्यासाठी लिंबू पाणी, कोमट पाणी किंवा ग्रीन टी पिण्याची अनेकांना सवय असते. पण रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल घडू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोमट पाणी पिणे अवघड वाटू लागते. पण सवय झाल्यानंतर शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय राहतो.(फोटो सौजन्य – istock)
न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती
उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यामुळे केवळ आरोग्याचं चांगले राहत नाहीतर पचनक्रिया सुधारते, त्वचेवर ग्लो येतो आणि शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण त्याऐवजी नियमित कोमट पाणी प्यायल्यास शरीरावर जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट होण्यास मदत होईल. उठल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रिया अतिशय स्लो होते आणि अन्नपदार्थ पचन होण्यास अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे फायदे.
रात्रीच्या झोपेनंतर संपूर्ण शरीर विषारी द्रव्यांनी भरलेले असते. हीच शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्यायले जाते. कोमट पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामावाटे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. कोमट पाणी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स पेय म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोमट पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडांवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते.
उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यामुळे पोटातील गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता हळूहळू कमी होते. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित एक ग्लास किंवा शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात कोमट पाणी प्यावे. वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
कोमट पाणी प्यायल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात. मुरुमे, सुरकुत्या आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. त्वचेचे बाह्य सौंदर्य वाढवण्यासाठी कोमट पाणी प्यावे.
कोमट पाणी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील नसा शांत होतात आणि आराम मिळतो. मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि मन शांत, सक्रिय करण्यासाठी कोमट पाणी पिणे खूप जास्त फायदेशीर आहे. कोमट पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात.
Ans: सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला द्रवपदार्थ मिळतात आणि पचनक्रियेला मदत होऊ शकते. काही लोकांना यामुळे सकाळची मलप्रवृत्ती सुलभ होण्यासही मदत होते.
Ans: पुरेसे पाणी पिणे पचनसंस्थेसाठी महत्त्वाचे आहे. कोमट पाणी काही व्यक्तींना आरामदायक वाटू शकते; मात्र ते पचनक्रिया सुधारण्यासाठी हमखास उपाय आहे, असे ठोसपणे म्हणता येत नाही.
Ans: आयुर्वेदात उष्ण किंवा कोमट पाण्याचा वापर पचनास अनुकूल मानला जातो. मात्र, व्यक्तीची प्रकृती आणि आरोग्यस्थितीनुसार आहार-विहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो.