शिवसेना (शिंदे गट)चे खासदार मिलिंद देवरा यांनी 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलणार असल्याचे वक्तव्य केले. सचिन अहिर यांच्या कार्यक्रमातील या विधानामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबाबत राजकीय चर्चांना वेग आला.
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी शाळा-कॉलेजेस तातडीने बंद करण्याची आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याची मागणी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत उबाठा गटातील खासदारांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचा दावा केला. विकासकामांसाठी शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याकडून राबवण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर रिडेवलपमेंट) देशभरात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेत केली.