वर्ध्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच (Photo - Social Media)
पुलगाव : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी मिळावी. समान काम समान वेतन ही मुख्य मागणी घेवून दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामध्ये सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचाही सक्रिय सहभाग आहे. या आंदोलनात मंगळवारपासून पुलगाव न्यायालयाचे कर्मचारी देखील सहभागी झाले. दुसऱ्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. (Wardha News)
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून कामकाज केले. त्यानंतर १६ व १७ ऑक्टोबर रोजी देखील काळया फिती लावून कामकाज केले. १७ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा आंदोलन पुकारले होते.
उच्च न्यायालयाने काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून ते रजा आंदोलन मागे घेण्यात आले. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी हे मंगळवारपासून संपावर गेले.
Wardha News : वर्धेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढला! तापमानाचा पारा घसरला
न्यायप्रणालीचा अविभाज्य घटक असलेले दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यावर स्वतःच्या न्यायहक्कांसाठी आंदोलनाची वेळ आली. न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक घटकाला लवकरात लवकर व योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कर्मचारी अन्यायग्रस्त आहेत. न्यायालयीन कर्मचान्यांच्याच न्याय हक्कांच्या मागणीकडे शासन गेली २१ महिने डोळेझाक करीत आहे. यामुळे न्यायालयीन कर्मचारी आंदोलन करीत आहे.
आष्टी (शहीद) येथील स्थानिक दिवानी न्यायालयातील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून न्यायालय परिसरात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. तालुका दिवानी न्यायालयातील सर्वच संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.
सर्व संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचा-यांनाही समान वेतनाचा न्याय मिळावा, अशी आदोलनकर्त्यांची मागणी आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Ans: दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी मिळावी आणि समान कामासाठी समान वेतन लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी संप सुरू आहे.
Ans: महाराष्ट्रातील सुमारे ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Ans: पुलगाव न्यायालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर आष्टी (शहीद) येथील दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.






