शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्वत: विकास लवांडे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विकास लवंडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Vikas Lawande Shaifek : विकास लवांडे यांच्यावर काही व्यक्तींनी शाईफेक केली असून वारकरी संप्रदाय आणि गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.