सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्वत: विकास लवांडे यांनी दिली आहे. लवांडेंनी एक्सवरती पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी, असे लवांडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणावरुन आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
लवांडे म्हणाले, माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला. कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे, कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार. सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, अशी माहिती देखील विकास लवांडे यांनी दिली आहे.
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या… pic.twitter.com/mfODGUBIlb — Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2026






