महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' माहिती आहे का? निसर्गाच्या कुशीत 'या' ठिकाणी लपलंय...
फिरणं म्हटलं की, तीच तीच नेहमीची काही निवडक ठिकाण आपल्याला आठवू लागतात. अशात आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अनोख्या ठिकाणाविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असं म्हटलं जात. तुम्हीही या महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगत असलेले हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. इथे तुम्ही नैसर्गिक सौंदर्यासह सुंदर वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण फार कमी लोकांना ठाऊक आहे, चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
भारतातील ‘या’ ठिकाणी पाहायला मिळेल इंग्लंड-स्वित्झर्लंडसारखे दृश्य, सहल बनेल संस्मरणीय
कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात तापोळा हे गाव वसलेले आहे. या ठिकाणाला महाराष्ट्राचा दडलेला खजिना असे म्हटले जाते. इथून तुम्हाला सुंदर आणि मनमोहक दृश्ये दिसतील. तापोळा हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर शहरापासून सुमारे 28 किमी, पाचगणीपासून सुमारे 44 किमी, कोरेगावपासून सुमारे 98 किमी आणि महाराष्ट्राच्या राजमाचीपासून सुमारे 139 किमी अंतरावर आहे. आपल्या सौंदर्याने हे ठिकाण दरवर्षी अनेक पर्यटकांना आप्ल्याकडे आकर्षित करते. तुम्ही इथे ट्रेकिंगपासून हायकिंग आणि कॅम्पिंगपर्यंतच्या अनेक ऍक्टिव्हिटीजचा आनंद लुटू शकता. इथल्या सुंदर वातावरणात तुम्ही छानसे फोटो किंवा व्हिडिओ देखील शूट करू शकता आणि येतील सौंदर्य आपल्या आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ शकता.
Manali Trip Planning: फक्त 10,000 रुपयांत कपल्स फिरू शकतात मनाली; अशा प्रकारे करा सहलीचे नियोजन
इथे पाहण्यासारखी ठिकाणे
तापोळ्याला तुम्ही अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. तुम्ही इथे जात असाल तर प्रथम शिवसागर तलावाला भेट द्या. तलावाच्या काठी गार वारे वाहत असतात. या तलावात तुम्ही बोटिंगचाही आनंद लुटू शकता. यानंतर तुम्ही येथील कास पठाराला भेट देऊ शकता, इथे तुम्हाला डझनभराहून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतील. हिवाळा आणि उन्हळ्यात कास पठाराचे सौंदर्य फार सुंदर बनते. शिवसागर तलाव आणि तापोळ्यातील कास पठारानंतर तुम्ही कोयना धरणाला भेट देऊ शकता. कोयना नदीवर बांधलेले हे धरण एक मोठे जलाशय आहे, जे पर्यटन स्थळ म्हणूनही काम करते.
इथे कसे जात येईल?
तापोळ्याला जाणे फार सोपे आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्रातील महाबळेश्वर शहराला गाठावे लागेल. महाबळेश्वर शहरापासून 28 किमी अंतरावर असलेल्या तापोळा येथे टॅक्सी किंवा कॅबने जाता येते. याशिवाय तुम्ही साताऱ्यावरूनही इथे जाऊ शकता. सातारा शहरापासून तापोळ्याचे अंतर सुमारे 81 किमी आहे.