Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC ची ‘रॉयल राजस्थान’ टूर; कमी बजेटमध्ये देता येणार ‘या’ शहरांना भेट

तुम्ही देखील राजस्थानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. IRCTC ने राजस्थान राज्याच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक अद्वितीय टूर पॅकेज आणले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 27, 2024 | 05:46 PM
IRCTC ची 'रॉयल राजस्थान' टूर; कमी बजेटमध्ये देता येणार 'या' शहरांना भेट

IRCTC ची 'रॉयल राजस्थान' टूर; कमी बजेटमध्ये देता येणार 'या' शहरांना भेट

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान हे भारतातील अशा शहरांपैकी एक आहे जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. देश-विदेशातून लाखो पर्यटक राजस्थानला भेट देतात. या राज्याची संस्कृती, कलाकृती, जीवनशैली आणि प्रसिद्ध पाककृती सर्वांना आकर्षित करतात. तुम्ही देखील राजस्थानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. IRCTC (भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन) ने या राज्याच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक अद्वितीय टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज विशाखापट्टणम आणि त्याच्या आसपासच्या भागातील लोकांना 9 रात्री आणि 10 दिवसांसाठी राजस्थानची सैर करण्याची संधी देते.

चला तर मग या पॅकेजची सर्व माहिती जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला देखील राजस्थानचा आनंद घेता येईल तेही कमी बजेटमध्ये

कमी बजेटमध्ये देता येणार ‘या’ शहरांना भेट

IRCTC च्या या पॅकेजद्वारे तुम्ही जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, माउंट अबू, पुष्कर आणि अजमेर या आठ प्रसिद्ध शहरांना भेट देऊ शकतात. टूरमध्ये चौकी धानी, हवा महल, देशनोक मंदिर, जुनागड किल्ला, आणि दर्गा शरीफ यांसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. हे पॅकेज 17 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासाला सुरुवात होईल.

हे देखील वाचा- डिसेंबरमध्ये फिरायचा प्लॅन करताय? तर भारतातील ‘ही’ ठिकाणे हिवाळ्यात भेट देण्यास ठरतील उत्तम

पॅकेजच्या किमती

टूर पॅकेजची किंमत विविध श्रेण्यांमध्ये उपलब्ध आहे. सिंगल ऑक्युपन्सीसाठी रु. 68,800, डबल ऑक्युपन्सीसाठी रु. 51,490, ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी रु. 48,630, बेड विथ चाइल्ड (11 वर्ष) रु. 40,290, आणि बेड नसलेल्या मुलासाठी (5-11 वर्षे) रु. 37,30 इतका खर्च आहे. या पॅकेजमध्ये प्रवास खर्च, हॉटेलचा खर्च आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. यात 3 तारांकित आणि 4 तारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, नाश्ता आणि रात्रीचे जेवण देखील दिले जाते.

तिकीट बुकुंग कुठे करता येणार

तिकीट बुकिंग किंवा पॅकेजशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourismindia.com ला तु्म्ही भेट देऊ शकता. मात्र तुम्हाला जर अचानक ट्रीप रद्द करावी लागल्यास यासाठी प्रवाशांनी प्रवासाच्या 21 दिवस आधी बुकिंग रद्द केल्यास पॅकेजच्या 30% शुल्क भरावे लागेल. 21 ते 15 दिवस आधी रद्द केल्यास 55% शुल्क भरावे लागेल. तर 14 ते 8 दिवस आधी रद्द केल्यास 80% शुल्क आणि 8 दिवसांपेक्षा कमी कालावधीत रद्द केल्यास कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत.

IRCTC चे रॉयल राजस्थान टूर पॅकेज प्रवाशांना राजस्थानचे वैभव अनुभवण्याची एक उत्तम संधी देते, ज्यात आरामदायक प्रवास, निवास आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला जाऊ शकतो.

हे देखील वाचा- मालदीवचा प्लॅन करताय पण खर्च परवडत नाही? मग भारताच्या या ‘मिनी मालदीव’ला नक्की भेट द्या, वाचतील लाखो रुपये

Web Title: Irctcs royal rajasthan tour package visit jaipur udaipur cities can be visited on a low budget nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 05:46 PM

Topics:  

  • IRCTC Tour Package

संबंधित बातम्या

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…
1

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…

यंदा हावई मार्गे करा केदारनाथ यात्रा! IRCTC सेवा तुमच्यासाठी सज्ज; जाणून घ्या भाडे
2

यंदा हावई मार्गे करा केदारनाथ यात्रा! IRCTC सेवा तुमच्यासाठी सज्ज; जाणून घ्या भाडे

IRCTC चे नवीन टूर पॅकेज लाँच! डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासह अनेक बौद्ध वारशांची करता येणार सफर
3

IRCTC चे नवीन टूर पॅकेज लाँच! डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासह अनेक बौद्ध वारशांची करता येणार सफर

Char Dham Yatra: चार धाम यात्रेसाठी लाइव्ह टूर पॅकेज सुरू, किंमत काय असेल? कोणकोणत्या सुविधा मिळतील ते जाणून घ्या
4

Char Dham Yatra: चार धाम यात्रेसाठी लाइव्ह टूर पॅकेज सुरू, किंमत काय असेल? कोणकोणत्या सुविधा मिळतील ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.