फोटो सौजन्य: सोशल मीडिया
आपल्या सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी परदेशात जाण्याची इच्छा असते. समुद्रकिनारी परदेशात जायचे असेल तर मालदीवचे नाव पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात येते. मात्र, अनेक वेळा बजेटमुळे परदेश प्रवासाचे स्वप्न काही लोकांना साकारता येत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही बजेटमुळे मालदीवला भेट देणे शक्य नसल्यास भारतातीलच एका मिनी मालदीवला भेट देऊ शकता. येथील अनुभव देखील तुम्हाल अगदी मालदीवसारखाच असेल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे मिनी मालदीव कुठे आहे. तर आज आपण या मिनी मालदीवबद्दल तसेच तिथे कुठे राहायचे आणि कसे जायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपल्या भारतात उत्तरखंडमध्ये एक असे ठिकाण आहे जे तुम्हाला मालदीवचा अनुभव देऊ शकते. हे ठिकाण म्हणजे उत्तराखंडमधील टिहरी धरणावर वसलेले ‘मिनी मालदीव’.
मिनी मालदीव कुठे आहे
तर मिनी मालदीव उत्तराखंडमधील टिहरी धरणावर स्थित आहे. टिहरी धरण हे भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाच्या जलाशयामध्ये ‘फ्लोटिंग हट्स’ आणि ‘इको रूम्स’ बांधण्यात आल्या आहेत. ही तरंगते घरे पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव देतात. जसे मालदीवमध्ये पाण्याच्या मध्यभागी गोड घरे बांधली गेली आहेत, तसेच येथेही या तरंगत्या घरांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत रोमॅंटिकक्षणाचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे या मिनी मालदीवला नक्की भेट द्या.
हे देखील वाचा- हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायचीय? मग भारतातील ‘या’ डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या
मिनी मालदीव खास का आहे?
उत्तराखंडचा मिनी मालदीव पर्यटकांसाठी आकर्षण बनलेले आहे. टिहरी धरणावर बांधलेल्या या तरंगत्या घरात राहण्याची एक वेगळीच मजा आहे. येथील निसर्गसौंदर्य पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. या ठिकाणी राहण्याचा अनुभव खूपच अद्वितीय आहे. तरंगत्या घरांव्यतिरिक्त, तुम्ही या ठिकाणी अनेक पाण्यातल्या खेलांचा आनंद घेऊ शकता. तुम्ही येथे ज्यात नौकाविहार, पॅरासेलिंग आणि आणखी इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकता. या मिनी मालदीवचा म्हणजेच टिहरी धरणाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी उन्हाळ्यात येथे सर्वाधिक पर्यटक येतात. येथील शांत आणि सुंदर वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही येथे आजूबाजूची ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता आणि टिहरी धरणाच्या सौंदर्याचे निरीक्षण करू शकता.
राहण्याची सोय
तुम्हाला मिनी मालदीवमध्ये राहण्यासाठी फ्लोटिंग हाऊस बुक करायचे असल्यास, तुम्ही ते सहज बुक करू शकता. कोणत्याही प्रवासाच्या ठिकाणी जाऊन किंवा टिहरी धरणावर जाऊन तुम्ही फ्लोटिंग हाऊस बुक करू शकता. तरंगत्या घरात राहण्यासाठी साधारणतः 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. या किमतीमध्ये तुम्हाला राहण्यासोबतच खाण्याचीही सोय मिळते. एका खोलीत दोनपेक्षा जास्त लोक राहू शकत नाहीत, त्यामुळे बुकिंग करताना याची नोंद घ्यावी.
मिनी मालदीवमध्ये कसे पोहोचायचे?
मिनी मालदीव म्हणजेच टिहरी धरणापर्यंत पोहोचणे खूप सोपे आहे. तुम्ही हवाई मार्ग, रेल्वे किंवा रस्त्यानेही जाऊ शकता. हवाई मार्गाने येत असाल तर जवळचे विमानतळ देहरादून आहे. देहरादूनहून तुम्ही टॅक्सीने टिहरी धरणावर पोहोचू शकता. रेल्वेने येत असाल तर ऋषिकेश हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. ऋषिकेशहून तुम्ही बस किंवा टॅक्सीने टिहरी धरणावर पोहोचू शकता. रस्त्याने येण्यासाठी उत्तराखंडचे विविध शहरांमधून टिहरीसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहेत. म्हणूनच, बजेटमध्ये मालदीवचा अनुभव घेण्यासाठी उत्तराखंडचा मिनी मालदीव हे उत्तम ठिकाण आहे.