आता पावसाळा संपून हिवाळ्याचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. काही लोकांना हिवाळ्यात घरी बसून गरमागरम चहा प्यायला आवडते, तर काहींना या ऋतूत निसर्गाच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घ्यायचा असतो. जर तुम्ही या हंगामात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. हिवाळ्यात भारतात प्रवास करण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यामुळे हा ऋतू अजूनच खास बनतो. जर तुम्ही निसर्गाच्या सुंदरतेचा आनंद घ्यायला आवडत असाल किंवा सांस्कृतिक अनुभवांचा शोध घेत असाल, तर तुमच्यासाठी काही उत्कृष्ट ठिकाणांची यादी आहे. हिवाळ्यातील या सुंदर ठिकाणांची भेट तुमच्या मनाला नवी ऊर्जा आणि आनंद देईल. भारतातील विविधता अनुभवण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या. ( फोटो सौजन्य: iStock)
डिसेंबरमध्ये फिरायचा प्लॅन करताय? तर भारतातील 'ही' ठिकाणे हिवाळ्यात भेट देण्यास ठरतील उत्तम
वाराणसी, उत्तर प्रदेश- काशी किंवा वाराणसी हे पवित्र धार्मिक स्थळ आहे. इथे घाटांवरून दिसणारे सुंदर दृश्य, गंगा नदीवर उड्डाण करणारे सायबेरियन पक्षी, संध्याकाळची आरती आणि भक्तीरसात तल्लीन झालेली माणसे हे सर्व मनाला शांती देतात
कच्छचे रण, गुजरात- तुम्हाला वाळवंटातील थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर कच्छचे रण एक आदर्श ठिकाण आहे. दोन महिन्यांचा कच्छ महोत्सव सांस्कृतिक उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. पारंपारिक खाद्यपदार्थ, वाळवंट सफारी, हस्तकला आणि चित्रपटातील तारे या सर्व गोष्टी इथे अनुभवता येतात
कुर्ग, कर्नाटक- भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे कुर्ग हे हिवाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील धुक्याच्या वातावरणात वाहणारे भव्य धबधबे आणि कॉफीचे मळे एखाद्या स्वप्निल दुनियेपेक्षा कमी नाहीत. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी हे एक आदर्श स्थळ आहे
तवांग, अरुणाचल प्रदेश- ईशान्य भारतात वसलेल्या या शहरात तुम्ही सुंदर बर्फाच्छादित हिमालय, प्राचीन मठ आणि भव्य दऱ्या यांचा अनुभव घेता येईल. तवांगमधील नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला शांती आणि आनंद देईल
पुद्दुचेरी- हे एक फ्रेंच शैलीतील समुद्रकिनारी शहर आहे. इथला ओस्टेरी तलाव पक्षीप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे. फ्रेंच खाद्यपदार्थ, वॉटर स्पोर्ट्स आणि समुद्रकिनारी चालण्याचा आनंद इथे घेता येतो. शांतता आणि विश्रांतीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे