'हे' देश कधीच साजरा करत नाही स्वातंत्र्यदिन! चीन-नेपाळसह अनेक देशांचा समावेश, कारण जाणून घ्या
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. भारतासह जगात असे अनेक देश आहेत, जे वर्षानुवर्षे गुलाम राहिले आणि नंतर कठोर परिश्रमाने त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. अशा देशांमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतही यावर्षी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला साजरा करणार आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? जगात असेही काही देश आहेत, जिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. याचे कारण म्हणजे, हे देश कधीच कोणत्या देशाचे गुलाम नव्हते. त्यामुळे या देशांमध्ये फक्त राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. यामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळ देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. याचे कारण म्हणजे, नेपाळला कधीही परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला नाही. नेपाळ हा जगातील अशा देशांपैकी एक आहे, जो भौगोलिकदृष्ट्या लहान असला तरी कधीही इत्तर देशांचा गुलाम बनला नाही. त्यामुळेच इथे कधीही स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. हा दक्षिण आशियातील सर्वात जुना देश आहे.
भारताशेजारील देश चीनही कधी स्वातंत्र्यदिन साजरा करत नाही. कारण हा देश कधीच पूर्ण गुलाम बनला नाही. येथे राजांनी राज्य केले आहे. 1949 च्या चिनी राज्यक्रांतीनंतर चीनचे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कम्युनिस्ट नेते माओ यांनी स्थापन केले. हा दिवस चीन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो.
आशियाई देश जपान जगभरात आपल्या तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. हा देशही कधीच कोणाचा गुलाम होऊ शकला नाही. जपानमध्येही स्वातंत्र्यदिन न साजरा करता, राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. हा राष्ट्रीय दिन जपानमध्ये 11 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
इराण हा एक इस्लामिक देश आहे. इराण देशातही स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही मात्र इथे राष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. इराण एप्रिलच्या पहिल्या दिवशी आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो. खरं सांगायचे झाले तर, ही तारीख पुढे-मागे बदलत राहते. कारण इराणमध्ये स्थानिक सौर दिनदर्शिका वापरली जाते. त्यामुळे इस्लामिक प्रजासत्ताक दिनाची तारीख मागे-पुढे होत असते.
जुलमी राजेशाहीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युरोपातील सर्वात मोठा देश फ्रान्समध्ये फ्रेंच क्रांती झाली. यातून कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळायचे नव्हते. फ्रान्सची वसाहत कधीच नव्हती. त्यामुळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.