Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशाच्या घाटगावमधील ‘या’ ठिकाणांचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क; लॉंग विकेंडमध्ये करा भेट देण्याचा प्लॅन

ओडिशा हे भारतातील अत्यंत सुंदर राज्य आहे. ओडिशा त्याच्या ऐतिहासिक मंंदिरांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे भारतामधील दहावे मोठे राज्य आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 03, 2024 | 05:09 PM
ओडिशाच्या 'या' ठिकाणांचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क; लॉंग विकेंडमध्ये करा भेट देण्याचा प्लॅन

ओडिशाच्या 'या' ठिकाणांचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क; लॉंग विकेंडमध्ये करा भेट देण्याचा प्लॅन

Follow Us
Close
Follow Us:

ओडिशा हे भारतातील अत्यंत सुंदर राज्य आहे. ओडिशा त्याच्या ऐतिहासिक मंंदिरांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे भारतामधील दहावे मोठे राज्य आहे. ओडिशा राज्यातील जगन्नाथ मंदिर मंदिर आणि कोणार्क मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. बंगालच्या उपसागराजवळ असलेले हे राज्य लाखो लोकांना आकर्षित करते. याच राज्याच्या जवळ घाटगाव येथे एक लपलेला खजिना आहे. भुवनेश्वरपासून सुमारे 165 किमी अंतरावर असलेले घाटगाव एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या परिसरात काही अप्रतिम पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरली आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात घाटगांव परिसरातील काही अप्रतिम ठिकाणांबद्दल

माता तारिणी मंदिर

घाटगावच्या यात्रेत सर्वात आधी भेट दिली जाते ते माता तारिणी मंदिराला. ओडिशा राज्यातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेले हे मंदिर तारा आणि तारिणी या जुळ्या देवींना समर्पित आहे. मंदिराचे पवित्र वातावरण, श्रद्धेने वाहिलेली नारळांची माळ, आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. या मंदिराच्या अनुषंगाने दरवर्षी लाखो पर्यटक घाटगावची वाट धरतात.

हे देखील वाचा- शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे ‘हे’ गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

घाटगाव वन परिक्षेत्र: निसर्गाचा खजिना

घाटगाव वन परिक्षेत्र हे घनदाट जंगल, तलाव आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घाटगावचे निसर्गाचे सौंदर्य अगदी शिखरावर असते. हायकिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत रमण्याची संधी मिळते. तुम्ही जर साहस प्रेमी असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

सनाघागरा धबधबा

घाटगावपासून काही अंतरावर असलेला सनाघागरा धबधबा इको टुरिस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. 50 फूट उंचावरून पडणारे पाणी, आजूबाजूची हिरवळ, आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवायची असेल तर हा धबधबा एक आदर्श ठिकाण आहे. येथील सौंदर्याने ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या भागातील लोक वीकेंडला येथे भेट देतात.

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

घाटगावच्या जवळ असलेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हत्ती अभयारण्य म्हणून ओळखले जाते. येथे हत्ती, बिबट्या, भुंकणारे हरीण, सांबर, आणि चार शिंगे असलेले हरणे पाहायला मिळतात. जंगल सफारीसाठी लोकप्रिय असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या विविधतेचा अनुभव घेता येतो.

घाटगावला कसे पोहोचाल?

भुवनेश्वर आणि कटकपासून घाटगाव सहजगत्या पोहोचण्याजोगे आहे. ओडिशातील कोणत्याही शहरातून येथे जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा- जोडप्यांसाठी खास IRCTC टूर पॅकेज; हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, लगेच तिकीट बुक करा

Web Title: Must visit these places of ghatgoan odisha you will be amazed by the beauty nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • Odisha

संबंधित बातम्या

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…
1

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा
2

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?
3

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
4

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.