फोटो सौजन्य: iStock
सणांचा उत्साह ओसरल्यानंतर लगेच लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे आणि नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमूनची तयारी महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमची हनिमून ट्रीप परफेक्ट बनवायची असेल, तर IRCTC तुमच्यासाठी खास पॅकेज घेऊन आले आहे. जे विशेषतः हनिमून जोडप्यांसाठी डिजाइन केले गेले आहे. हे पॅकेज संपूर्ण प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवते, त्यामुळे जोडप्यांना चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या आवडीच्या डेस्टिनेशनचे पॅकेज आजच बुक करा. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता. ही ठिकाणे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला नक्कीच आवडतील. आणि तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ही ठिकाणे फिरू शकता.
चला तर मग जाणून घेऊयात या टूर पॅकेजबद्दल
गंगटोक, दार्जिलिंग आणि न्यू जलपाईगुडी
तर या टूर पॅकेजमध्ये गंगटोक, दार्जिलिंग आणि न्यू जलपाईगुडी या तीन प्रसिद्ध ठिकाणांना एकत्र भेट देण्याची संधी मिळते. हे टूर पॅकेज 30 नोव्हेंबरपासून कोलकाता येथून सुरू होणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही 5 रात्री आणि 6 दिवसांचा प्रवास करू शकाल. या पॅकेजमध्ये ट्रेनद्वारे प्रवास करण्याची सुविधा आहे. या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 37,550 रुपये शुल्क आहे. यामध्ये राहण्याची सोय, जेवण्याची सोय प्रेक्षणीय स्थळांसाठी रेल्वे तिकीट यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा- विकेंड ट्रीप प्लॅन करताय? मग उज्जैनच्या या आसपासाच्या अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या
गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मावलिनॉन्ग आणि काझीरंगा
या पॅकेजमध्ये तुम्ही गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मावलिनॉन्ग आणि काझीरंगा या ठिकाणांना भेट देऊ शकता. हे पॅकेज 3 डिसेंबरपासून चंदीगड येथून सुरू होणार असून तुम्ही 6 रात्री व 7 दिवसांचा अनुभव देईल. यामध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळेल. दोघांनी प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 48,860 रुपये लागतील.
चंदीगड, कुफरी आणि शिमला
याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत चंदीगड, कुफरी आणि शिमला या ठिकाणांना भेट द्यायचे असेल तर हे पॅकेज तुमच्यासाठी आहे. यामध्ये या तीन ठिकाणांचा समावेश आहे. हे टूर पॅकेज 4 ऑक्टोबरपासून कोलकाता येथून प्रवास सुरू होईल. हे पॅकेज 5 रात्री व 6 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाचा आनंद या पॅकेजद्वारे घेता येईल. या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 25,050 रुपये शुल्क असेल.
या सर्व पॅकेजमध्ये तुमच्या प्रवासाची सगळी सोय आधीच करण्यात आलेली आहे. तुम्ही हनिमूनच्या विशेष क्षणांचा आनंद घेण्यासाठी अद्याप तिकीट बुक केले नसतील, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लगेचच तिकीट बुक करा. हनिमूनसाठी विशेष डिझाइन केलेले हे टूर पॅकेज तुमच्या ट्रीपला खास आणि अविस्मरणीय बनवेल. तुम्हाला व तुमच्या पार्टनरला ही ठिकाणे नक्की आवडतील.
टीप– तिकीट बुक करण्याआधी अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती तपासा आणि मगच बुक करा.