या गावामुळे पुण्याच्या विमानतळाचे नाव बदलणार! संत तुकारामांच्या नावावर एयरपोर्टचे नवीन नाव...
आतापर्यंत तुम्ही अनेक गाव आणि शहरांची नावे बदलून दुसरी ठेवण्यात आली. देशात असे अनेकदा घडले आहे. आता याच पार्शवभूमीवर, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नावही बदलण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता हे विमानतळ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे या नावाने ओळखले जाणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत संत तुकाराम कोण आहेत, हे नाव का निवडले गेले आणि या विमानतळाचा एकंदरीत इतिहास काय? या सर्व गोष्टींविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – दिल्ली विमानतळावर सुरू होणार देशातील पहिली एअर ट्रेन, जाणून घ्या आश्चर्यकारक वैशिष्ट्ये
पुणे एयरपोर्टचे नाव पूर्वी ‘लोहेगाव विमानतळ’ असे होते. हे नाव आता बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात येत आहे. राज्य सरकारने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे नाव बदलाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर विमानतळाचे नाव आता लवकरच बदलले जाणार आहे.
हेदेखील वाचा – Navratri 2024: काय सांगता, इथे देवीच्या मूर्तीला चक्क घाम फुटतो, नवरात्रीनिमित्त या प्रसिद्ध शक्तिपीठाला नक्की भेट द्या
गेल्या महिन्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाला 17 व्या शतकातील प्रचलित संतांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. लोहगाव जिथे विमानतळ स्थित आहे ते संत तुकाराम महाराजांच्या आईचे गाव होते. प्रक्रियेनुसार, राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे, ज्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.
संत तुकाराम महाराज, हे देशातील एक प्रचलित संत आहेत. ते 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक आदरणीय हिंदू संत आणि कवी होते. भक्ती चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संत तुकाराम यांचा जन्म 1608 मध्ये पुण्याजवळील देहू या गावात झाला, त्यांनी आपले अधिकतर जीवन हे आध्यात्मिक साधना, सामुदायिक समारंभ (कीर्तन) आयोजित करणे आणि कविता लिहिण्यासाठी समर्पित केले.
पुणे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यासह, हा भारतीय इंडियन एअर फोर्सचा बेस आहे जो भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराला सेवा प्रदान करतो. हे पुण्याच्या ऐतिहासिक केंद्रापासून सुमारे 11 किमी उत्तर-पूर्वेस लोहेगाव येथे आहे. भारतातील प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हे विमानतळ नववे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.