नवरात्र हा एक भारतीय सण आहे जो दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. याच्या नावावरूनच या सणाची माहिती मिळते. या सणांनिमित्त अवघे नऊ दिवस देवीला स्थापित करून तिची पूजा केली जाते आणि नंतर तिचे विसर्जन केले जाते. या निमित्त अवघे नऊ दिवस रात्री देवीसमोर गरबा डान्स आयोजित केला जातो आणि यात अनेकजण आनंदाने सहभागी होत असतात. नऊ आणि रात्र या दोन्ही शब्दांच्या मिश्रणातून नवरात्री हा शब्द बनला आहे.
देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. नवरात्रीनिमित्त विविध मंदिररतही देवीची मनोभावनेने पूजा केली जाते. तसेच याकाळात देवीच्या मंदिरात हजारो भाविकांची गर्दीदेखील पाहायला मिळते. अनेकजण याकाळात देवीच्या दर्शनासाठी मंदिरांना भेट देत असतात. तुम्ही देवीच्या अनेक अद्भुत मंदिरांविषयी ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला देवीच्या अशा एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जिथे मातेच्या मूर्तीला घाम येतो. देवीला हा असा घाम येणे हे सौभाग्याचे प्रतीक आहे अशी भाविकांची मान्यता आहे.
हेदेखील वाचा – या समुद्रात कोणीही बुडू शकत नाही, येथील पाणी आहे लोकांसाठी वरदान, दूर करते अनेक रोग
देवीचे हे मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आहे. हे मंदिर शक्तीपीठ भाले माता या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीत येथे भाविकांची भरगच्च गर्दी पाहायला मिळते. भाविक इथे फार श्रद्धेने येत असतात. या मंदिराची खासियत म्हणजे, या मंदिरात ठेवण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीला घाम येतो. लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा मातेला घाम येतो तेव्हा मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या मंदिरातील पुजारी सांगतात की, या गावात देवी मातेचे दर्शन झाले होते, त्यामुळे देवीचे मंदिर येथे बांधण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – अनके वर्षांचे रहस्य उलगडले, यामुळे लोक लोक पिंड दानसाठी गया’ला जातात, प्राचीन कथा जाणून घ्या
हिमाचल प्रदेशातील भाले हे गाव डलहौसीपासून 35 किमी अंतरावर आहे. या गावाच्या नावावरूनही या मंदिराचे नाव ओळखले जाते. इथे येण्यासाठी तुम्ही कॅब, विमान, रेल्वे अशा तिन्ही पर्यायांचा अवलंब करू शकता. तुम्हाला जर इथे विमानाने यायचे असेल तर दिल्लीहून तुम्हाला डलहौसीसाठी फ्लाइट मिळेल. , त्यानंतर तुम्हाला कॅब किंवा बसने येथे जावे लागेल. जर तुम्ही इथे ट्रेनने येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिल्लीहून पठाणकोटला जावे लागेल. डलहौसी पठाणकोटपासून 82 किलोमीटर अंतरावर आहे.