या फेस्टिव्ह सिजनला एक्सप्लोर करा श्रीलंकातील हे सुंदर 5 बीच, समुद्राकिनारी घ्या सनसेटचा आनंद
काही दिवसांतच सगळ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होतील. या फेस्टिव्ह सीजनला तुम्ही श्रीलंकामधील सुंदर समुद्रकिनारे एक्सप्लोर करू शकता. येथे तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या कुटूंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. सुंदर समुद्रकिऱ्याच्या शेजारी बसून तुम्ही सनसेटचा आनंद घेत तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. श्रीलंकामध्ये असलेले हे समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.
हेदेखील वाचा- दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठरतील दिल्लीतील ही ठिकाणं, कमी पैशात करा भरपूर शॉपिंग
या समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही सर्फिंगचा आनंद घेऊ शकता. श्रीलंकेतील मिरिसा, याला, बेंटोटा, उनावटुना, हिक्काडुवा या समुद्रकिनाऱ्यांना तुम्ही भेट देऊ शकता. येथील प्रत्येक ट्रीप तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे. चला तर मग श्रीलंकातील या समुद्रकिनाऱ्यांबद्दल जाणून घेऊया.
मिरीसा हे समुद्रकिनारी असलेले सुंदर शहर आहे जे पर्यटकांना आकर्षित करते. येथे तुम्हाला डॉल्फिन आणि ब्लू व्हेल पाहण्याचा उत्तम अनुभव मिळेल. स्वच्छ नीलमणी पाणी सर्फिंग उत्साही लोकांसाठी स्वर्ग आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेले आणि जंगली टेकड्यांमध्ये लपलेले निर्जन समुद्रकिनारे मिरिसाला उष्णकटिबंधीय स्वर्ग बनवतात. भरती-ओहोटीच्या खडकांमुळे मिरीसाच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
तुम्ही इथे भेट देत असाल तर सावध राहा कारण इथे पोहणे धोकादायक ठरू शकते. कधीकधी खडबडीत लाटा तुमचा जीव धोक्यात घालू शकतात. त्याऐवजी, तुम्ही याला या ठिकाणी असलेल्या नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला हत्ती, बिबट्या आणि मगरीसारख्या प्राण्यांना जवळून पाहण्याची संधी मिळते. याशिवाय मऊ वाळूवर फिरताना निसर्गाचा आनंद लुटता येतो.
श्रीलंकेच्या सुंदर भूमीवर वसलेला बेंटोटा समुद्रकिनारा पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. येथील सुंदर दृश्य आणि शांत वातावरण तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. विशेषतः संध्याकाळी, जेव्हा सूर्यास्त होतो आणि आकाश अनेक रंगांनी चमकते तेव्हा बेंटोटाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. तुम्ही पामच्या झाडांच्या सावलीत फिरू शकता किंवा रिव्हर राफ्टिंग, स्नॉर्कलिंग, डायव्हिंग आणि कयाकिंग यासारख्या अॅडवेंचरस वॉटर अॅक्टिविटीजचा आनंद घेऊ शकता.
हेदेखील वाचा- भारतापासून केवळ 4 तासांच्या अंतरावर आहे हे सुंदर बेट, प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही
जर तुम्हाला निसर्ग सौंदर्यासोबतच शांत वातावरणात पाण्यात पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल उनावटुना समुद्रकिनारा बेस्ट आहे. उनावटुना हा केळीच्या आकाराचा समुद्रकिनारा आहे. येथे खजुरीच्या झाडाच्या दोरीवर झुलून तलावाच्या सौंदर्याचा आनंद लुटू शकता. याव्यतिरिक्त, जपानी शांती स्तूपासाठी एक लहान वॉक देखील तुमची ट्रीप अधिक संस्मरणीय बनवेल.
हिक्काडुवाचा समुद्रकिनारा पार्टी प्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथे तुम्हाला बरेच पब, क्लब आणि बार सापडतील जेथे तुम्ही रात्रभर नाचू शकता आणि मजा करू शकता. हिक्काडुवामध्ये तुम्हाला तुमच्या मनानुसार तुमच्या आवडत्या पेयाचा आनंद घेण्याची, आवडत्या गाण्यावर डान्स करण्याची आणि मित्रांसोबत संस्मरणीय क्षण घालण्याची संधी मिळणार आहे. हिक्काडुवाचे किनारे तुम्हाला पार्टीचा अनुभव देईल जो तुम्हाला कायम लक्षात राहील.