जिल्ह्यातील खानापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांचे झालेले नुकसान त्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडत पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेताना ठाकरे यांनी त्यांना धीर दिला. संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.