सध्या राज्यसह देशभरामध्ये औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन चांगलेच वातावरण तापलेचे पाहायला मिळत आहे. छावा चित्रपटानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर व त्याचे अस्तित्वच महाराष्ट्रातून मिटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देखील आता औरंगजेबाची अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथे असलेली कबर हटविण्याची मागणी केली असून यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. येत्या 17 तारखेला राज्यभरातील तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच तस्सम अधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करणार असल्याचे बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नवराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे.