नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीचे आगमन साजरे करण्यात आले. या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना जलद, सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर–पुणे, बेंगळुरू–बेलगावी आणि अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण झाले. स्वागत समारंभास रेल्वे अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. खासदार लंके यांनी अहिल्यानगर स्थानकावर थांबा मिळवून दिल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे विशेष आभार मानले.