अहिल्यानगर शहरांमध्ये माजी सैनिकांची असलेली जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन ही संस्था शहरासह जिल्ह्यामध्ये वृक्षरोपणाचे विविध उपक्रम राबवत असते. आज फादर्स डे चे औचित्य साधून अहिल्यानगरच्या तपोवन रोड या ठिकाणी पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून फादर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे सर्व माजी सैनिक सभासद उपस्थित होते. यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी फादर्स डे निमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत निसर्गाचे आपण देणे लागतो. पुढच्या पिढीला काही द्यायचे असेल तर वृक्षाशिवाय दुसरं अमूल्य काही नसल्याचे पेरे पाटील म्हणाले आहेत.