Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटांची जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान आता आणखी एक मराठी चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्याचे नाव आहे ‘आफ्टर ओ.एल.सी’. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 18, 2025 | 11:56 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आफ्टर ओ.एल.सी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
  • ‘आफ्टर ओ.एल.सी’ची संपूर्ण स्टारकास्ट
  • ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
दुनियेच्या आड दडलेलं एक गूढ लवकरच उलगडणार आहे. ‘आफ्टर ओ.एल.सी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, नवीन कथा पाहायला मिळणार असल्याचे समजले आहे. बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. अगदी थाटामाटात ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटाचा ट्रेलर सुरू होताच वातावरणात एक अज्ञात तणाव पसरलेला दिसत आहे. मैत्री, विश्वासघात, आणि लपलेल्या रहस्यांच्या या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्कंठा वाढवणारा आणि रहस्यमय थराराने, एक्शन पॅक्ड सीन्सने भरलेला हा सिनेमा आहे.

Bigg Boss 19 family week : पत्नी आकांक्षाला पाहून गौरव खन्ना झाला रोमँटिक, मारली मिठी! अमाल मलिकने उडवली खिल्ली

चित्रपटामधील अनेक रहस्य ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, दिग्दर्शकाचे उत्तम दिग्दर्शन, शूट करण्यात डीओपीने कसलीही न सोडलेली कमतरता, जबरदस्त आणि रोमँटिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टींनी ट्रेलरमधूनच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत. आणि प्रेक्षकांसाठी हा संगम पर्वणीचं ठरणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

ट्रेलरनंतर येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र दिग्दर्शित ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ही कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत. ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे.

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना

कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Trailer launch of marathi film after olc the film will be released on november 28th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • Marathi News

संबंधित बातम्या

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना
1

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना

Humane Sagar Death : ३४ वर्षीय प्रसिद्ध गायकाचे धक्कादायक निधन, गायकाच्या आईचे मॅनेजरवर गंभीर आरोप
2

Humane Sagar Death : ३४ वर्षीय प्रसिद्ध गायकाचे धक्कादायक निधन, गायकाच्या आईचे मॅनेजरवर गंभीर आरोप

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे
3

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे

जागतिक स्तरावर बाल लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा दिवस; जाणून घ्या याचे महत्त्व आणि यंदाची थीम
4

जागतिक स्तरावर बाल लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा दिवस; जाणून घ्या याचे महत्त्व आणि यंदाची थीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.