राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याच अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यमांची संवाद साधताना महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले. बारामती पोटनिवडणुकीतील प्रचारावरून होणाऱ्या विलीनीकरणाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. नाशिकमधील ‘टीसीएस’ प्रकरणावर बोलताना त्यांनी संपूर्ण कंपनीला बदनाम करणे अयोग्य असल्याचे सांगत दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले,तर इराण-इस्रायल संघर्षामुळे उद्भवलेली इंधन टंचाई लक्षात घेता राज्यात रॉकेल पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून राज्यात मुबलक रॉकेलचा साठा असल्याचे सांगितले.दरम्यान, नाशिकला पालकमंत्री नसला तरी कुंभमेळ्याचे नियोजन आणि प्रशासकीय कामे सुरळीत सुरू असल्याचे भुजबळ यांनी यावेळी नमूद केले.