अलिबाग तालुक्यात रस्त्यांवर पडलेले मोठे-मोठे खड्डे तसेच नागरिकांना रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्या यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते. यावर उपाययोजना म्हणून माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातील संबधित अधिकाऱ्यांशी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर देखील उपस्थित होते. पंडितशेठ पाटील यांनी सांगितले की,रस्त्यांची अवस्था गेल्या १५-२० वर्षात जेवढी खराब झाली नव्हती तितकी बिकट अवस्था आता झाली आहे..सगळे रस्ते एम.एस .आय डी.सी.कडे गेले आहेत आणि एम.एस .आय डी.सी कडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही.त्याचप्रमाणे अलिबाग-वडखळ रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना त्रास होतो.. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गणपतीपूर्वी बुजविण्यात यावे व ते सुस्थितीत ठेवावेत जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, अशी मागणी पंडीत शेठ पाटील यांनी केली आहे.