बैलगाडा शर्यतींच्या जगतात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील “लखन” बैल. या बैलाची सुरक्षा आणि देखभाल एखाद्या आमदारापेक्षाही कमी नाही, इतका मोठा दिमाख या बैलाचा तयार झाला आहे. लखनच्या मालकीचे मनोहर चव्हाण यांनी सांगितल्यानुसार, या बैलाने गेल्या दोन वर्षांत त्यांना तब्बल एक फॉर्च्युनर, एक बोलेरो, तीन बुलेट आणि सोळा दुचाकी अशी जवळपास २० वाहने कमावून दिली आहेत.अलीकडेच सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित श्रीनाथ केसरी स्पर्धेचे मुख्य पारितोषिक म्हणून फॉर्च्युनर गाडी घोषित होती. ही प्रतिष्ठेची किताब लखनने पटकावल्याने तो एका रात्रीत राज्यभर चर्चेचा विषय बनला.