जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चिपळूण तालुक्यातील विकास कामांना दिलेल्या भेटी दरम्यान, अलोरे कॉलनी ते देउळवाडी मुंडे पूल रस्ता ग्रामा 258, या रस्त्यावरील कि. मी 0/050 मधील पुलाची पहाणी केली असता, सदर पूल अतिशय नादुरुस्त झाला असल्याचे आढळले आहे. सदर पूल 80.00 मीटर लांबीचा व 2.50 मीटर रुंदीचा असून पुलावरून खासगी वाहतूक सुरू आहे. या पुलाचे 8 पिलर पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले असून, सदर पिलर व पुलाच्या खालच्या बाजुचे कॉंक्रीट पडल्याने स्टील उघडे पडले आहे. तसेच 2 पिलरच्या पायाच्या तळापर्यंत मोठी भगदाडे पडली असून, सदर पूल कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी