
Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत चार आत्महत्यांच्या घटना; तीन विवाहित महिलांसह १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) शहरात गेल्या तीन दिवसांत आत्महत्येच्या चार घटना समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांमध्ये तीन विवाहित महिला आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. भाईंदर, मिरा रोड, नवघर आणि उत्तन सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या असून, चारही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पहिल्या घटनेत भाईंदर पश्चिमेकडील राई गावातील न्यू सालासर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता सुदामा लाहा (वय २७) यांचा शुक्रवारी दुपारी राहत्या घरी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पती सुदामा लाहा यांनी त्यांना तातडीने टेंभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास भाईंदर पोलीस करत आहेत. दुसऱ्या घटनेत मिरा रोड येथील सृष्टी सेक्टर-५ मधील अनुराधा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सुप्रिया मोरे (वय २७) यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…
तिसऱ्या घटनेत भाईंदर पूर्वेकडील पूजानगर परिसरातील भैरव दर्शन इमारतीत राहणाऱ्या गंगा ललितकुमार अदलाखा (वय ५३) यांचा शनिवारी मृत्यू झाला. घरात कोणी नसताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांचे पती ललितकुमार यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चौथ्या घटनेत उत्तन येथील धावगी डोंगर परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रविवारी मृत्यू झाला. तिला उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री सुमारे ९ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, ती काही दिवसांपासून सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त होती. या घटनेची माहिती तिची आई सबिया शेख यांनी पोलिसांना दिल्यानंतर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, अवघ्या तीन दिवसांत चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने मिरा-भाईंदर शहरात चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः तरुण वयातील महिलांसह अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद आणि अडचणीच्या काळात योग्य मदत मिळण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या चारही घटनांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
Ans: मिरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांच्या कालावधीत आत्महत्यांच्या चार घटना घडल्या.
Ans: या चार घटनांमध्ये तीन विवाहित महिला आणि एका १६ वर्षीय मुलीसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला.
Ans: चारही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.