जम्मू – काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिलं आहे.त्यामुळे भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून या तिरंगा पदयात्रेस सुरुवात करण्यात आली..या तिरंगा पदयात्रेत माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या सह एक हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या..यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅली मार्ग दणाणून सोडला.दरम्यान दहशतवाद मोडून काढण्यासाठी काँग्रेस पक्ष भारतीय सैनिकांच्या बरोबर आहे.त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सैनिकांच्या शौर्यासाठी तिरंगा पदयात्रा काढण्यात येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.. शिवाय ऑपरेशन सिंदूर बाबत विषय दुसरीकडं नेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी मुळ विषयाकडं यावं अशी मागणी करत पाकिस्तानबाबत काय भूमिका असली पाहिजे, हे इंदिरा गांधी च्या रुपानं देशांनं बघितल्याच त्यांनी म्हटलं आहे.तसचं गांधी घराण्यांच कार्य पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील सतेज पाटलांनी यावेळी केला तर याबाबतीत सत्य बाहेर आलं पाहिजे अशी भूमिका खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी मांडली आहे.